मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

ती सध्या काय करते ? : अंकुश चौधरी जागवणार पहिल्या प्रेमाच्या आठवणी  .. 

2 मिनिट वाचन
शेअर करा:
ती सध्या काय करते ? : अंकुश चौधरी जागवणार पहिल्या प्रेमाच्या आठवणी  .. 

 

प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कधीतरी प्रेम केलेलं असतं. कुणी ते एकदाच करतं तर कुणी अनेकदा. पण पहिल्या प्रेमाची बात काही औरच असते. या पहिल्या प्रेमाच्या आठवणी प्रत्येकाच्या मनाला गुदगुल्या करत कायमस्वरूपी चिकटलेल्या असतात.. याच आठवणी जाग्या करायला एक नवा चित्रपट येतोय.. 'ती सध्या काय करते ?' 

           चित्रपटाचा छान असा टिझर रिलीज झालाय. सतिश राजवाडे यांचं दिग्दर्शन आणि अंकुश चौधरी - तेजश्री प्रधान ही जोडगोळी या चित्रपटाची रोमॅन्टिक मजा वाढवणार आहे. आणि यात सरप्राईज पॅकेज आहे ते अभिनय बेर्डे आणि लिटल चॅम्प आर्या अंबेकर यांचं!!  या जोडीने अंकुश आणि तेजश्रीची किशोरवयीन भूमिका साकारलीय.  आडनावावरून लक्षात आलंच असेल की अभिनय हा विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा आहे. 

टीझर पाहून चित्रपटाचं स्वरुप आपल्याला समजू शकतं. टीझरच्या बॅकग्राऊंडला वाजणारं 'हृदयात वाजे समथिंग' हे गाणं आणि त्यात दिसणारी आर्या-अभिनयची जोडी गोड वाटते. झी स्टुडिओजतर्फे या चित्रपटाची निर्मिती होतीय. 


आपले प्रेमवीर हा चित्रपट पहायला जाणार हे तर नक्की आहेच. पण त्यासाठी २०१७ पर्यंत वाट पहावी लागेल. पण एक विचारायचं राहिलंच..  तुमची 'ती' सध्या काय करते ??

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

जेव्हा ग्रीसला नर्गिस आणि मधुबाला अक्षरशः ग्रीक देवता वाटत होत्या!
मनोरंजन

जेव्हा ग्रीसला नर्गिस आणि मधुबाला अक्षरशः ग्रीक देवता वाटत होत्या!

१९५० च्या दशकात हिंदी चित्रपटांनी ग्रीसवर कशी भुरळ घातली होती आणि नर्गिस-मधुबाला या अभिनेत्री ग्रीक संस्कृतीचा भाग कशा झाल्या? वाचा रंजक इतिहास.

११ सप्टेंबर, २०२६

गोंधळ : महाराष्ट्राच्या मातीतील नाद ऑस्करच्या दिशेने
मनोरंजन

गोंधळ : महाराष्ट्राच्या मातीतील नाद ऑस्करच्या दिशेने

दिग्दर्शक संतोष डावखर यांचा 'गोंधळ' चित्रपट २०२७ च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडला गेला आहे.

१८ सप्टेंबर, २०२६

'अशी चिकमोत्याची माळ': गणपतीच्या सुपरहीट गाण्याची गोष्ट!
मनोरंजन

'अशी चिकमोत्याची माळ': गणपतीच्या सुपरहीट गाण्याची गोष्ट!

गणेशोत्सवात घरोघरी वाजणारे लोकप्रिय गाणे 'अशी चिकमोत्याची माळ' कसे रचले गेले आणि संगीतकारांना रॉयल्टी न मिळाल्याची खंत.

१८ सप्टेंबर, २०२६

अंकल पै : चित्रांच्या चौकटीतून भारताची गोष्ट सांगणारा माणूस
मनोरंजन

अंकल पै : चित्रांच्या चौकटीतून भारताची गोष्ट सांगणारा माणूस

अमर चित्र कथांच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या भारतीय मुलांना इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून देणारे लाडके 'अंकल पै' म्हणजेच अनंत पै.

१७ सप्टेंबर, २०२६