आयुष्मान खुराणाचे दोन सॉलिड सिनेमे पाठोपाठ !! ट्रेलर पाह्यलं का भाऊ??

आयुष्मान खुराणा सध्या चलतीवर आहे. त्याच्या आगामी २ सिनेमांचे ट्रेलर आलेत आणि दोन्ही ट्रेलर्स अफलातून आहेत. पहिला सिनेमा आहे ‘अंधाधून’. या सिनेमात तो एका अंध पियानो प्लेअरची भूमिका करतोय. म्हटलं तर ही एक मर्डर मिस्ट्री आहे. आयुष्मानचं पात्र हे अंध आहे पण ते अंध वाटत नाही. तो खरच आंधळा नसून आंधळा असण्याचा अभिनय करतोय का हा प्रश्न आपल्याला ट्रेलर बघताना पडतो. राधिका आपटे सध्या सगळीकडेच दिसते. तशी ती इथेही आहे. पण तिचा अभिनय वाईट नाही हे मान्य करावच लागेल. तिच्या सोबत आणखी एक गुणी अभिनेत्री आहे - तब्बू. सगळंच आम्ही सांगणार नाही भाऊ. ट्रेलर बघून घ्या !!

दुसरा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाचं नाव आहे ‘बधाई हो’. मुलगा वयात आला की प्रत्येक आईला वाटत असतं की आता मुलाने सून आणावी आणि नातवांच सुख द्यावं. त्याच वयात जर आईचं स्वतः गरोदर राहिली तर काय होईल ? एक तर हा विषय फार गंभीर होऊ शकतो किंवा विनोदाचा. पण गोष्ट जेव्हा ‘बरेली की बर्फी’च्या निर्मात्यांची असेल तर या गोष्टीला मस्त विनोदाची फोडणी मिळते. हेच तुम्हाला पाहता येईल ‘बधाई हो’ सिनेमात.

आयुष्मान साकारत असलेल्या पत्राचं आता लग्नाचं वय झालंय. तसं त्याचं एकीबरोबर अफेअर सुद्धा आहे. पण घरात वेगळंच प्रकरण सुरु होतं. आई चक्क गरोदर होते. पुढच्या गमतीची झलक ट्रेलर मध्ये आपण पाहू शकतो.

आयुष्मान खुराणाने गेल्यावर्षी ‘बरेली की बर्फी’ आणि ‘शुभ मंगल सावधान’ मधून चांगलं काम केलं होतं. त्याच्या चित्रपटांच्या निवडीबद्दल खास कौतुक केलं पाहिजे. सामान्य माणसांच्या भूमिका आणि प्रभावी कथा असलेले त्याचे चित्रपट वेगळे ठरतात. याची सुरुवात ‘विकी डोनर’ पासूनच झाली होती. चला तर आता ‘बधाई हो' चा ट्रेलर बघून घ्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required