computer

अंडरटेकरने अक्षयला खऱ्या फाईटचं चॅलेंज दिलंय; पहा यावर अक्षयची मजेदार प्रतिक्रीया...

१९९६ मध्ये आलेल्या 'खिलाड़ियों का खिलाड़ी' या चित्रपटाला मागच्या आठवड्यात २५ वर्षे पूर्ण झाली. हा चित्रपट तरुणांच्या विशेष लक्षात राहिलाय तो यातल्या अक्षय कुमारच्या खतरनाक स्टंट आणि फाईट सीन्समुळे. अगदी WWE चा सुपरस्टार अंडरटेकरलाही त्यानं या चित्रपटात पाणी पाजलं होतं. आणि बरीच वर्षे आपल्यापैकी अनेकांचा हाच समज होता की यात अक्षयने खऱ्या अंडरटेकर सोबत शूटिंग केलंय. पण अर्थातच तो अंडरटेकर डमी होता. पण आता असं काय घडलंय की चक्कं खऱ्याखुऱ्या अंडरटेकरने अक्षयला फाईटचं आव्हान दिलंय?

झालं असं की चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अक्षय कुमारनं एक मजेदार मिम ट्विट केलं. ज्यात ब्रॉक लेसनर, रोमन रेन्स, आणि ट्रिपल एच या WWE स्टार्स सोबत अक्षयचाही फोटो होता. अंडरटेकरला WWE मध्ये ज्या मोजक्या फाईटर्सनी हरवलंय त्या यादीत अक्षयनं स्वतःलाही सामील करून घेतलं. या मिम सोबत त्यानं चाहत्यांना हेही सांगितलं की चित्रपटातील अंडरटेकरची भूमिका ही ब्रायन ली नावाच्या मल्लाने निभावली होती. 

अक्षयने पोस्ट केलेला हा मिम वायरल झाला आणि साक्षात खऱ्याखुऱ्या अंडरटेकरने या पोस्टवर इंस्टाग्रामवरती कंमेंट केली. या  खऱ्या अंडरटेकरचं खरं नाव आहे मार्क कॅलावे. "हो! सांग तु खऱ्याखुऱ्या मॅचसाठी कधी तयार आहेस" असं विचारत अंडरटेकरने खिलाडी अक्षयला लढण्याचं आव्हान दिलं. 

अंडरटेकरच्या या आव्हानाला उत्तर म्हणून अक्षयनेही विनोदी रिप्लाय दिला. "माझा इन्शुरन्स चेक करून सांगतो भावा" असं म्हणत अक्षयने हेच सांगून टाकलं की खऱ्याखुऱ्या अंडरटेकरशी पंगा घेणं त्यालाही जमायचं नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required