computer

अमिताभ बच्चनचे सहसा पाहण्यात नसलेले ११ फोटो!!

आज अमिताभ बच्चनचा वाढदिवस. प्रेमाने महानायक, बिग बी अशा अनेक नावांनी त्याला ओळखलं जातं. आज अनेकांनी त्याच्या वाढदिवसाबद्दल सोशल मिडियावर पोस्ट्स टाकल्या असतील. कुणी त्याच्या आवडत्या भूमिकांच्या, तर कुणी त्याच्या आवडत्या डायलॉगच्या. मग यात बोभाटा कसे मागे राहणार? आम्ही घेऊन आलो आहोत त्याचे सहसा आपण न पाहिलेले काही निवडक फोटोज. 
या फोटोत ते घेतले तेव्हाचा काळ, फॅशन्स आणि साधारण कोणत्या सिनेमाच्या किंवा त्या कलाकाराच्या खाजगी घटनांच्या पुढेमागे ते घेतले गेले असतील याचं स्मरणरंजन असतं.. चला तर मग पाहूयात अमिताभ बच्चन यांचे काही अगदी दुर्मिळ नाही, पण सहसा पाहण्यात नसलेले हे फोटोज!!

खून पसीना सिनेमाच्या शूटिंगच्या वेळचा फोटो. हा वाघ खरा आहे हं..

शोलेची टीम.. 

अमर अकबर अँथनीच्या सेटवर त्याची दोन्ही बाळं त्याला भेटायला आली होती, तेव्हाचा हा फोटो..

खरंतर या दोघांचे इतके फोटो लोकांनी काल आणि आज शेअर केले आहेत, की आम्हांला यांचा एकत्र फोटोच द्यायचा नव्हता. पण हा फोटो पाहून राहावलं नाही. 

या बंगाली भादुरीबाई "हम तो भैय्या युपी के हैं, हिंदीमें ही बात करेंगे" म्हणून नाकाने कांदे सोलतात. पण तरीही कधीतरी मराठी अवतारात आलेल्या दिसतात. 

नक्की काय चालू आहे?

विनयशील आणि नम्र नाना..

तुम्हीही तुमच्याकडे असलेले असे फोटो आमच्यासोबत नक्की शेअर करा

सबस्क्राईब करा

* indicates required