computer

मुलांचा कॅरम खेळतानाचा फोटो व्हायरल का होत आहे....काय खास आहे या फोटोत ?

आज सगळीकडेच मुलं मोबाईलवर गेम खेळताना दिसतात, पण थोडी वेगळी वाट पकडून गरिबांच्या वस्तीकडे गेलं की दिसतं, तिथली मुलं आजही गोट्या, भोवरा, लंगडी सारखे खेळ खेळतात. अशाच एका खेळाचा फोटो सध्या व्हायरल होतोय. काय खास आहे या फोटोत ? चला पाहूया.

हा फोटो महिंद्र कंपनीचे मालक आनंद महिंद्र यांनी शेअर केलाय. या फोटोत लहान मुलं कॅरम खेळताना दिसत आहे. मग यात खास काय आहे ? तर, खास असं की ह्या खेळत वापरण्यात आलेला कॅरमबोर्ड हा खराखुरा कॅरमबोर्ड नसून मातीत तयार केलेला आहे.

पण, हा फक्त मातीत रेघोट्या ओढून तयार केलेला कॅरमबोर्ड नाही, तर खऱ्या कॅरमबोर्डला असतात तशा रेषा आणि चार बाजूला भोक पण आहेत. राहता राहिला प्रश्न कवड्यांचा तर त्यासाठी मुलं बाटल्यांच्या झाकणाचा वापर करत आहेत.

ही आयडिया आनंद महिंद्र यांना भलतीच आवडली. त्यांनी फोटो शेअर केल्यावर नेटकाऱ्यांनी पण या कल्पनेचं स्वागत केलं. लोक मुलांच्या डोकेबाजीचं कौतुक करत आहेत. काही मोजके ट्विट्स वाचूया.

तर, तुम्हाला कशी वाटली ही आयडिया ?

सबस्क्राईब करा

* indicates required