computer

निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही म्हणून लोकांनी काय केलं पाहा !!

मंडळी, निवडणुकीत उभा असलेला उमेदवार निवडून येण्यासाठी अनेक आश्वासनं देतो, पण निवडून आल्यावर त्याची पूर्तता होते का ? तर, हा एक वादाचा मुद्दा आहे. आज आश्वासनांचा विषय काढण्यामागचं कारण म्हणजे मेक्सिकोत घडलेली एक घटना.

तर त्याचं झालं असं, की दक्षिण मेक्सिकोत निवडणुका झाल्या त्यावेळी ‘जॉर्ज लुईस एस्कांडो हर्नांडेज’ यांनी लोकांना मोठी आश्वासनं दिली होती. ते निवडणूक जिंकले आणि मेयर झाले. बरेचसे राजकारणी जे करतात तेच त्यांनी केलं. दिलेली आश्वासनं विसरले.

काही दिवसापूर्वी ते एका सभागृहात असताना रागावलेल्या जमावाने त्यांना सभागृहाच्या बाहेर खेचून काढलं आणि त्यांना एका ट्रकला बांधून काही मीटर पर्यंत ओढलं.

मेयर साहेबांना ट्रकला बांधणाऱ्या जमावातील लोक हे टाहोलाबल नावाच्या आदिवासी जमातीतील लोक होते. त्यांच्याकडे ‘क्लब’ नावाचं हत्यार पण होतं. त्यांनी मेयरवर हल्ला केला तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांनी मेयरला वाचवण्याचा लुटुपुटुचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. शेवटी पोलीस आले आणि त्यांनी मेयरला सोडवलं.

उपस्थित जमावात काही शेतकरी पण होते. त्यांच्यात आणि पोलिसात झालेल्या भांडणात काही शेतकऱ्यांना दुखापत झाली.

हे ज्यामुळे सुरु झालं ती मागणी अगदीच क्षुल्लक होती. लोकांना फक्त रस्त्याची दुरुस्ती करून हवी होती. लोकांची मागणी पूर्ण होईल असं निवडणुकीपूर्वी त्यांना सांगण्यात आलं होतं, पण तसं घडलं नाही.

तर, या घटनेतून मेयर बचावले आहेत. ते आता खटला भरण्याच्या तयारीत आहेत. एका मुलाखतीत ते म्हणाले, की “५० ते ६० लोकांच्या जमावाने काही सरकारी अधिकाऱ्यांचं अपहरण करण्याचा प्रत्यत्न आणि मला ट्रकला बांधून ओढलं. हे सगळं त्यांनी पैशांसाठी केलं आहे”

आता लोक म्हणतायत की रस्ता बनवून द्या आणि मेयर म्हणतायत की या लोकांना पैसे पाहिजेत. कोणाचं खरं असावं ? तुम्हाला काय वाटतं ?

सबस्क्राईब करा

* indicates required