व्हिडीओ ऑफ दि डे : महागुरूंच्या या व्हिडीओला लोक ट्रोल का करत आहेत? तुम्हीच बघून ठरवा!!

Subscribe to Bobhata

वरचा व्हिडीओ बघण्याआधी हे वाचून घ्या :

महागुरू आणि सगळ्यातलं सगळं येणारे आपले सचिनजी पिळगावकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी कुठेही इंटर्व्ह्यू दिलेला नाही किंवा ते कुठेही जज म्हणून झळकलेले नाहीत. तर यावेळी त्यांनी चक्क एक व्हिडीओ सॉंग काढून स्वतःवर ट्रोलींगची आफत ओढवून घेतले आहे.

आपल्याला सर्वांनाच माहित आहे की महागुरू उत्कृष्ट नृत्य करतात आणि सुरेल गातात. त्यांनी त्यांच्या या नाना कलांचा वापर करून मुंबईवर आधारित गाणं तयार केलं आहे. या गाण्याचं नाव आहे “आमची मुंबई – द मुंबई अँथम”. हे गाणं त्यांनी स्वतःच गायलेलं आहे. या गाण्यातून मुंबई शहराचं वैशिष्ट्य दिसतं म्हणे. पण प्रत्यक्षात या गाण्याने त्यांचं हसं केलं आहे. भोजपुरी सिनेमाही त्यापेक्षा बरा असं म्हणण्याची वेळ आता आली आहे.

त्याचं काय आहे ना भाऊ, ना नीट संगीत, ना धड शब्द आणि नृत्याच्या आजूबाजूलाही न फिरकणारा ‘डाँन्स’ तोही चक्क महागुरुंचा. चित्रिकरणाबद्दल तर विचारूच नका राव. आता अशा व्हिडीओ सॉंगमध्ये महागुरू दिसल्यावर आणखी काय होणार आहे?

ट्रोलींगनंतर व्हिडीओचे निर्माते ‘शेमारू बॉलीगोली’ने हे गाणं काढून टाकलंय. पण या गाण्याचा प्रोमो अजूनही युट्युबवर उपलब्ध आहे. चला तर गाणं तर काढून टाकलं, पण प्रोमोच बघून घ्या. पण आपल्या रिस्कवर. नंतर कोणी बोलू नका की आमचा वेळ वाया घालवला.

 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required