तुम्हाला अरिजित सिंग आवडतो? मग हा व्हिडीओ बिल्कुल बघू नका !!

अरिजित सिंग भाऊचं सध्या फॅड आलंय राव. जिकडे बघावं तिकडे त्याचीच गाणी. ब्रेकअप झालेल्यांचा तो हक्काचा गायक आहे. जुन्या पिढीकडे रफी-किशोरची ‘तन्हाई’ वाली गाणी असली तरी आजच्या पिढीला अरिजितच्या रूपाने एक दर्दभरा गायक मिळाला आहे. त्याचा ‘चन्ना मेरिया’ ऐकून तर भले भले रडलेत राव.

...तर आज अरिजित पुराण लिहिण्याचं कारण म्हणजे त्याने एका लाईव्ह इव्हेंटमध्ये गाणं गायलं आहे आणि त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघण्याआधी एक विशेष सूचना :

जर तुम्हाला अरिजित सिंग आणि त्याचं गाणं आवडतं तर कृपया तुम्ही हा व्हिडीओ बघू नका. तुमचं मन विचलित होण्याची शक्यता आहे.

जर तुम्हाला रिस्क घ्यायचीच असेल तर खाली बघा.

रॉकस्टारमधलं ‘नादान परिंदे’ गाणं त्याने गायलं आहे. हे गाणं गात असताना माईक वाकडा झाला. (आपल्याकडच्या गणेश उत्सवात होतो तसा.) माईकने मान टाकलेली बघून अरिजितचं टाळकं सटकलं. मग त्याने (इंग्रजी) शिव्या वापरून माणसांना हाक मारली. आवाज ऐकून माणसांची धावाधाव झाली आणि शेवटी माईक नीट करण्यात आला. आणि त्यानंतर अरिजितने जे काही गाणं गायलंय ते ऐकून लोकं गपगार झालेत भाऊ.

हा सगळा प्रकार कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. अरिजित सारखा गायक एवढा बेसूर गाऊ शकतो याचा शोध हा व्हिडीओ बघून नव्याने लागला आणि त्याने निरागसपणे दिलेल्या शिवीबद्दल तर काही बोलायलाच नको. आता यावर अनेकजण म्हणतील त्याने तर इंग्रजीत नेहमी वापरणारा शब्द म्हटला आहे, पण इंग्रजीत शिवी दिली तर 'कूूूल'  अन मराठीत दिली तर ‘ब्लडी फुल ?’ असो....

मंडळी अरिजितच्या फॅन्सना टॅग करा आणि त्यांना त्यांच्या रिस्कवर हा व्हिडीओ दाखवा!!

सबस्क्राईब करा

* indicates required