जुन्या नोटांचा खजिना बघितला का? रक्कम बघून चक्कर येईल राव !!

५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बंद होऊन एक वर्ष उलटून गेलं. नोटबंदीच्या काळात काळा पैसा पकडला जाऊ नये म्हणून त्या नोटांना काही भ्रष्ट लोकांनी जाळून खाक केलं, काहींनी त्यांना नदीत फेकलं, काहींनी रस्त्यावर फेकलं, काहींनी त्याचे बारीक तुकडे केले, काहींनी कचऱ्यात फेकलं. पण याही पलीकडे जाऊन एकाने तर चक्क जुन्या नोटांचा बेड बनवला आहे. या नोटांची रक्कम तब्बल १०० कोटी एवढी आहे.

नॅशनल इंव्हेस्टीगेशन एजन्सी (NIA) आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी कानपूरमधल्या स्वरूपनगर येथे छापा मारला आणि त्यांना जुन्या नोटांचा खजिना गवसला. या नोटा एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीत सापडल्या आहेत. राव, नोटा जप्त केल्यानंतर त्यांची किंमत १०० कोटी असल्याचं समजलं. या नोटा एवढ्या आहेत की अजूनही त्यांना मोजण्याचं काम चालू आहे.

या नोटा कोणाच्या आहेत आणि या इमारतीत कशा आल्या हे अजूनही समजलेलं नाही. पण हा जुन्या बाद झालेल्या नोटा पांढऱ्या करून देण्याच्या व्यवसायाचा भाग असल्याची कुजबुज ऐकू येतेय..

सबस्क्राईब करा

* indicates required