एकटेपणा घालवण्याच्या उपायांसाठी या देशानं चक्क मंत्रिमंडळ नेमलं !!

आपण दिवस भर लोकलच्या गर्दीत, ऑफिस मध्ये, बाजारात, मित्रांबरोबर, सोशल मिडीयावर, इत्यादी ठिकाणी माणसांनी वेढलेलो असतो मग अश्या ठिकाणी एकटेपणा येण्याचा प्रश्नच येत नाही. पण आजूबाजूला अनेक माणसं वावरत असूनही अनेकांना आज एकटेपणाचा सामना करावा लागत आहे. तंत्रज्ञानाने जग जवळ आलं असलं तरी लोक मात्र दुरावले आहते हे आजचं वास्तव आहे.

एकटेपणाची समस्या वाढलेली असल्याने ब्रिटन मध्ये पहिल्यांदाच माणसाच्या एकटेपणासाठी एक स्वतंत्र मंत्री नेमण्यात आला आहे. यां मंत्र्याचं नाव आहे ‘ट्रॅसी क्राऊच’. ‘मिनिस्ट्री ऑफ लोनलीनेस’ नावाच्या मंत्रिमंडळाचं कामकाज त्या बघणार आहेत.

स्रोत

एकटेपणा हा कोणत्याही कारणाने येऊ शकतो. आपल्या जवळ कोणीही बोलणारं किंवा ऐकणारं नसल्याने किंवा बोलणारी व्यक्ती दुरावल्याने एकटेपणा येऊ शकतो. तसेच वृद्धत्व हे देखील एक कारण असू शकतं. एकटेपणातून सोडवून घेण्यासाठी लोक आत्महत्येपर्यंत जातात. हा एकटेपणा वाढू नये म्हणून या मंत्रिमंडळाकडून प्रयत्न केले जाणार असल्याचं इंग्लंडच्या पंतप्रधानांनी सांगितलं आहे. इंग्लंड मध्ये गेल्या वर्षी तब्बल नव्वद लाख लोकांना एकटेपणाचा त्रास करावा लागला होता. 

लोकांमध्ये संवाद होईल आणि नवीन माणसांशी संपर्क होऊ शकेल यासाठी अनेक मार्ग आज उपलब्ध असूनही एकटेपणा घालवण्यासाठी एक स्वतंत्र मंत्रिमंडळ नेमावं लागणं म्हणजे आजचं भयाण वास्तव दाखवून देत आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required