computer

सर्जिकल स्ट्राईकमध्ये वापरलेल्या शस्त्रांची घेऊया दसऱ्याच्या निमित्ताने खास माहिती !!!

दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रे पांडवांनी हातात घेतली असे महाभारतात सांगितले आहे, म्हणून दसर्‍याला शस्त्राचे पूजन केले जाते. पण मंडळी, सध्याचे दिवस छुप्या युध्दाचे, अघोषित युध्दाचे आहेत. सतत शस्त्र सज्ज असण्याला आता पर्याय नाही,  कारण रात्र वैऱ्याची आहे.

गेल्या वर्षी २९ सप्टेंबर रोजी आपण यशस्वी सर्जीकल स्ट्राईक केला होता. या प्रसंगी वापरलेल्या शस्त्रांचा आढावा घेणे म्हणजे एक प्रकारची शस्त्रपूजाच! चला तर बघू या ही सर्व शस्त्रे आहेत तरी कोणती !!!

१. इन्सास

वजन : 4.15 किलोग्राम

लांबी : 37.8 इंच

वैशिष्ट्य : इन्सास मशीनगन भारतीय बनावटीची आहे आणि भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक दरम्यान याच हत्याराचा वापर केला होता. AKM या रायफलसारखं हिचं डिझाईन असलं तरी इन्सासमध्ये अनेक फरक आहेत. रायफल आणि मशीनगन यांचं मिश्रण म्हणजे इन्सास. इन्सासमधून एका मिनिटात तब्बल ६०० ते ६५० गोळ्यांच्या फैरी झाडल्या जाऊ शकतात.

२. टॅवोर – २१

वजन : ३.२७ किलो

लांबी : २८ इंच

वैशिष्ट्य : टॅवोर २१ ही आधुनिक रायफल भारतीय स्पेशल फोर्सच्या वापरात आहे. टॅवोर २१ ची निर्मिती इस्राईलने केली आहे आणि हिची खासियत म्हणजे ही रायफल वेळ आल्यास स्वयंचलितरीत्याही वापरता येते.  टॅवोरने एका मिनिटात तब्बल ७५० ते ९५० गोळ्या झाडता येतात.
 

३. ग्लॉक १७

दिसायला नेहमीच्या पिस्तुलासारखी दिसत असली तरी ही गन खूप पॉवरफुल आहे राव. जगात सर्वात प्रसिद्ध पिस्तुल म्हणून याची ओळख आहे. वजनाला हलकी आणि ५० मीटरच्या रेंजमध्ये अचूक वेध घेण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ग्लॉक १७ ऑस्ट्रियन बनावटीची आहे आणि १९८२ पासून संपूर्ण जगात वापरली जात आहे. एका वेळी गनमध्ये आपण १० पेक्षा अधिक गोळ्या ठेवून मारा करू शकतो.

४. M4 कार्बाईन

वजन : ३.४० किलो

लांबी : ३३ इंच

अमेरिकन बनावट असलेली M4 कार्बाईन ही M16A2 या रायफलचं हलकं आणि आधुनिक वर्झन आहे. M4 बरोबर आपण ग्रॅनाईड लाँचरसुद्धा जोडू शकतो. एका मिनिटाला ५०० मीटर मध्ये तब्बल ७०० ते ९५० गोळ्या झाडण्याची क्षमता यात आहे. ही रायफलसुद्धा भारतीय जवानांच्या वापरात आहे. 

५. इंस्टाल्झा C90

वजन : ४.८ किलो

लांबी : ३७ इंच

इंस्टाल्झा C90 स्पेन बनावटीची ‘ग्रॅनाईड लाँचर’ आहे. खांद्यावरून ग्रॅनाईडचा मारा करण्यासाठी याचा वापर होतो. इंस्टाल्झा कमी वजनाची असल्याने एक जवान आपल्या खांद्यावर सहज पेलू शकतो. ३०० मीटरमध्ये धावत्या लक्ष्यावर इंस्टाल्झाने अचूक वेध घेता येते. 

६. गॅलील स्नायपर रायफल (IMI Galil ACE)

वजन : ३ किलो किंवा अधिक

लांबी : २९ इंच (विविध प्रकारानुसार)

गॅलील स्नायपर रायफल इस्राईलमध्ये तयार झालेले आहे आणि सध्या  भारतीय जवानांच्या वापरातदेखील आहे. सिनेमात शार्प शुटर जी रायफल वापरतात त्या पद्धतीची ही रायफल आहे असं आपण म्हणू शकतो. ३०० ते ५०० मीटरच्या रेंजमध्ये गॅलीलने अचूक निशाणा लावता येतो. एका मिनिटात तब्बल ६०० ते ८८० गोळ्या एकाच वेळी झाडता येतात.

 

 

मंडळी या शस्त्रांची माहिती घेतल्या नंतर तुम्हाला समजलं असेलच की आपण सर्जिकल स्टाईकमध्ये यशस्वी का आणि कसे झालो ते !!!

 

 

आणखी वाचा :

भारतीय सेना आपल्या रिटायर्ड  कुत्र्यांना का मारून टाकते ? जाणून घ्या...

सबस्क्राईब करा

* indicates required