देणाऱ्याने देत जावे : महादान मोहीम आणि ठाण्यातील एका तरुणाची कथा !!

असं म्हटलं जातं की आपण समाजाचे काही तरी देणे लागतो.  पण फार कमी लोक आहेत जे या वाक्प्रचाराला अनुसरून काम देखील करतात. आज अनेक तरुण सामजिक कार्यात गुंतलेले आहेत. यापैकी फारच कमी लोकांची माहिती आपल्याला असते. ही तरुण पोरं आपल्या आसपासच असतात, पण फरक एवढाच की यांचं काम गुपचूपपणे सुरु असतं. कोणतेही बॅनर, फलक न लावता.
अशाच एका तरुण मित्राची आम्ही आज तुमच्याशी भेट करून देणार आहोत.

नाव : किशोर प्रसाद
ठिकाण : वागळे इस्टेट, ठाणे

वडिलांच्या मृत्यूनंतर आईने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्याला कसे वाढवले, हे आपल्या डोळ्यांनी बघत तो मोठा झाला. त्याला फारच कमी वयात ‘मोठं’ व्हावं लागलं. शिक्षणात तो हुशार होताच, पण त्याच्याकडे शिक्षणासाठी पैसा नव्हता. ही कमतरता भरून काढली “विद्यादान सहायक मंडळ, ठाणे” या संस्थेने. पार्टटाईम नोकरी करत आपल्या कुटुंबाला सांभाळत किशोरने आपलं शिक्षण पूर्ण केलं. या संस्थेमार्फत त्यानं सोमनाथ श्रमदान शिबिराला भेट दिली. त्यावेळी त्याचा आणि कुष्ठरोग्यांच्या पहिल्यांदा संपर्क आला. त्या दिवसाची आठवणी सांगताना तो म्हणतो की ‘घरी आल्या नंतर मी रात्रभर रडलो होतो.”
सोमनाथ श्रमदान शिबीर, वेध, आनंदवन, हेमलकसा भेट देणे या उपक्रमांतून तो घडत गेला आणि शेवटी त्याने ठरवले की सामाजिक क्षेत्रात झेप घ्यायची. अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना भेटी देणे, दिवाळीला स्वतःला कपड़े न घेता त्या पैशातून अनाथ मुलांना खेळाचे साहित्य देणे, 31st चं सेलिब्रेशन पोलीस बांधवांसोबत करणे, झाडे लावणे, आनंदवन, हेमलकसासाठी साडयांचा उपक्रम.. यासारखे बरेच उपक्रम त्याने राबवले. 
किशोर करत असलेल्या कार्यबद्दल लिहू तेवढं कमीच आहे. त्याच्या कामाचा आवाका मोठा आहे. तो आज या क्षेत्रात कार्यरत आहे आणि भविष्यात त्याच्याकडे अनेक उप्रकम तयार असणार यात शंकाच नाही. 

सध्या तो किसानपुत्र आंदोलनाचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय.  तसंच एका उपक्रमासाठी त्याला आपली मदत हवी आहे.
हा उपक्रम आहे “महादान मोहीम”

काय आहे महादान मोहीम हे त्याच्याच शब्दात जाणून घेऊया :

“महादान ही वंचित निराधार मुलां-मुलींसाठीची, ज्यांना आजवर प्रामुख्याने जुने कपड़ेच वापरायला मिळतात अश्या मुलांना, नवीन कपडे देणारी मोहीम आहे. महादान मोहीम आहे त्या आदिवासी वाड्यापाड्यावरील स्त्रियांसाठी ज्यांनी नवीन साड्या कधी पाहिल्याच नाहीत...”

“वंचितांची दिवाळी करूया आनंदी...आपल्या मुलांसोबत एक जोडी कपड़े यांच्यासाठीही...आपल्या आई , बहिणीला, पत्नीला साडी घेताना एक साडी त्या आदिवासी माऊलींसाठीही घेऊया.....”

या उपक्रमात मदत करण्यासाठी तुम्ही किशोरला खालील क्रमांकावर संपर्क करू शकता !
किशोर प्रसाद - 9167759492

 

आणखी वाचा :

वॉल ऑफ काइंडनेस : देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे !

सबस्क्राईब करा

* indicates required