अंमली पदार्थाविरूध्द अभियान:भाग २ - म्याँव म्याँवचे दुष्प‌रिणाम‌

आम्ही काही महिन्यापूर्वी तुम्हाला “मुंबईत म्याँव म्याँवची साथ ?” या लेखात म्याँव म्याँवच्या वाढत्या पराभवाबद्दल माहिती दिली होती. आता गेल्याच महिन्यात कृतिका चौधरी या मॉडेलच्या खुनाची केस समोर आली त्यातही म्याँव म्याँवचा संबंध असल्याचं म्हटलं जातंय. ती केस अशी :

भैरवनाथ सोसायटीचा पाचवा मजला. इथे कृतिका चौधरी नामक स्ट्रगलिंग अभिनेत्री राहायची. सर्वांशी तशी ती मनमोकळेपणाने वागणारी.. त्यामळे सर्वांच्या परिचयाची. पण काही दिवसांपासून ती सोसायटीत दिसलीच नाही.  फ्लॅटही बंदच होता. शेजाऱ्यांनी त्याकडे तेवढं लक्ष दिलं नाही. पण जेव्हा तिच्या फ्लॅट मधून कसलातरी वास येऊ लागला तेव्हा शेजाऱ्यांना शंका आली आणि त्यांनी पोलिसांना बोलावलं. फ्लॅट उघडल्यानंतर कृतिकाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला आणि खळबळ माजली.

पोलिसांच्या चौकशीत समजलं की कृतिका ‘म्याँव म्याँव’ हे अंमली पदार्थ घ्यायची आणि त्याचेच ६००० रुपये थकल्यामुळे तिची हत्या झाली. हे फक्त प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. यावरची कायदेशीर कार्यवाही सुरु आहे.

 

अंमली पदार्थ विरोधी अभियान : भाग २

  ५ फेब्रुवारी २०१५ला अंमली पदार्थांच्या यादीत  मेफेड्रॉन हे ड्रग दाखल झाले.  हा मानवनिर्मीत ड्रग आहे. या मेफेड्रॉनचे रासायनिक सुत्र 4- मिथाईल मेथ कॅथीनॉन असे आहे.  त्यामुळे त्याला 4-एमएमसी किंवा एमकॅट किंवा एमडी नावाने ओळखले जाते. या ड्र‌ग‌चे आणखी एक अतिशय गोड नाव आहे ते म्हणजे म्याँव म्याँव. हे नाव त्या ड्रगच्या परिणामामुळे पडले आहे.  कारण हे ड्रग घेतले, डोळ्याच्या बाहुल्या विस्फारल्यासारख्या होतात आणि चेहरा मांजरीसारखा वाटतो.

Image result for meow meow drug info

स्रोत

भारतात पूर्वी केटामाईन नावाचे ड्र‌ग खूप चाल‌त‌ असे. प‌ण त्यावर बंदी आल्यानंतर २००५ पासुन व्यसन करणारे आणि ड्रगच्या अवैध व्यापारात गुंतलेले लोक नविन ड्रगच्या शोधात होते. साधार‌ण २०१२-१३च्या सुमारात मेफेड्रॉन आले अणि  व‌र्ष‌भ‌रात‌च‌ म्ह‌ण‌जे २०१४-१५ मध्ये या ड्रगने धुमाकुळ घातला. त्याच्याव‌र  बंदीही न‌व्ह‌ती. त्यामुळे ते खुले आम विकले जात होते, अग‌दी ऑनलाईन ऑर्डर दिली तर घरपोच डिलीव्हरीही मिळत होती. अतिशय स्वस्त (रू. ७०/- ते १००/- प्रति ग्रॅम) असल्याने शाळकरी मुलेही या ड्रगच्या विळख्यात अडकत होती. या ड्रगचे परिणाम एमडीएमए किंवा ऍम्फेटामाईन किंवा कोकेनच्या जवळपास जाणारे आहेत आणि किंमत जवळपास १०० पट कमी होती. प्र‌त्येक प्र‌कार‌च्या ड्र‌गचे वेग‌ळ्या प्र‌कारे सेव‌न केले जाते. हे  मेफेड्रॉन पानात किंवा पान मसाल्यात मिसळुन तोंडावाटे सेवन करतात किंवा ते नाकपुड्यातुन सुर्र‌क‌न ओढून घेत‌ले जाते.

Popular party drug: Figures reveals a government ban on the substance has failed to curb drug users' appetite for mephedroneस्रोत

गंम‌त म्ह‌ण‌जे मुळात मेफेड्रॉन हे झाडाला घाल‌ण्यात येणारे खत  आहे. ड्रग म्हणून याचा वापर सर्वात आधी चीनमध्ये केला गेला. अर्ध्या जगात मेफेड्रॉनवर यापूर्वीच बंदी घातलेली आहे आणि  मेफेड्रॉनच्या वापरामुळे अनेक व्यसनी प्राणास मुकले आहेत. शाळकरी आणि कॉलेजमध्ये जाणारी मुले परीक्षाकाळात जागरण करण्याच्या गरजेमुळे मेफेड्रॉनच्या वापराला उद्युक्त होतात आणि बघता बघता मेफेड्रॉनचे व्यसनी होतात. फॅशन इंडस्ट्रीत काही व्यक्तिना, भूक कमी झाल्याने, वजनात घट होत असल्याने मेफेड्रॉन वापराचा मोह होतो. मेफेड्रॉनची धुंदी  केवळ ४५ ते ५०  मिनीटेछ टिक‌ते. त्यामुळे  एकदा सेवन केल्यावर तासाभरात पुन्हा तलफ येते.

मेफेड्रॉनच्या वापरामुळे व्यसनींना उत्साहाची भावना निर्माण होते, फाजील आत्मविश्वास वाढतो, माणुस खूप बडबडायला लागतो, सगळे जग सुंदर वाटायला लागते, भिन्न लिंगी साथीदाराला वारंवार स्पर्श करावासा लागतो. त्यामुळे पार्ट्यात किंवा नववर्षाच्या स्वागत पार्टीत हे ड्रग अतिशय लोकप्रिय असते.  मात्र या ड्रगची धुंदी उतरल्यावर वापरणारा एकदम डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते.  मेफेड्रॉनचे व्यसन करणाऱ्या व्यक्तीची भुक मरते, क‌धी क‌धी ते झोपेत भीतीदाय‌क  रीतीने दात खायला लागतात‌, काहीवेळा दाताला गार्ड न बसवल्यास दाताचा भुगा होईल असे वाटायला लागते. स्नायूंना झटके बसायला लागतात, डोकेदुखी, शरीराचे तापमान वाढते, रक्तदाब वाढतो, चिंताग्रस्तता वाढते, छातीत दुखायला लागते, हृदयाचे ठोके वाढतात आणि अनियमित होतात, लघवीला त्रास होतो, पौरूषात शिथिलता येते, योनीमार्ग कोरडा पडायला लागतो,  हातापायाची बोटे थंड आणि निळी पडतात. वजन घटायला लागते, निद्रानाश होतो. थोड‌क्यात, क्षण‌भ‌राची म‌जा झालेली अस‌ते आणि त्याचे पुढ‌चे प‌रिणाम अतिश‌य भ‌यान‌क अस‌तात‌.

श्री सुहास गोखले

( क्रमश;)

सबस्क्राईब करा

* indicates required