या राख्या बहिणींनी तुम्हांला बांधल्या तर ओवाळणी परावडणार नाही ना भाऊ...काय आहे असं या राख्यांमध्ये ??

गुजरातमधल्या रक्षाबंधन स्पेशल ९००० रुपयांच्या मिठाईनंतर आज आम्ही घेऊन आलो आहोत १० अशा राख्या, ज्यांना बघून समस्त बहिणींना घाम फुटेल. राव, अनेकांना महागड्या गोष्टींचा शौक असतो. तुम्हालासुद्धा असा शौक असेल तर या राख्या एकदा बघाच. सोने आणि हिरे या दोन महागड्या गोष्टींचा वापर करून या राख्या तयार करण्यात आल्या आहेत. तुमच्या भावासाठी याहून मोठं सरप्राईज काय असेल?
चला तर बघूया, या १० राख्या आहेत तरी कशा..? आणि हो त्यांची किंमत किती आहे ??
१०. दि खालसा राखी
या राखीला बनवण्यासाठी १८ कॅरेट शुद्ध सोन्याचा वापर केला गेला आहे. राखी बरोबरच याचा पेंडंट म्हणूनही वापर करता येईल.
किंमत - १८,८३१
९. ओम मून लोटस राखी
या राखी मध्ये तब्बल ३१ हिरे बसवलेले आहेत. तसंच सोन्याचा सुद्धा वापर केला आहे.
किंमत - १८,५९०
८. त्रिशूळ राखी
१४ कॅरेट सोने आणि अस्सल हिरे वापरून या राखीला तयार करण्यात आलंय.
किंमत - १७,५८०
७. कंपास राखी पेंडंट
१८ कॅरेट सोन्याची ही राखी पेंडंट म्हणूनही वापरता येते.
किंमत - १६,७२०
४. सुपरहिरो गोल्ड राखी
सुपरहिरोच्या मागे जो कपडा फडफडत आहे त्यात तब्बल १६ हिरे बसवण्यात आलेत राव. सोन्याची शुद्धता १८ कॅरेट आहे.
किंमत - १६,२४०
२. इंग्रेव्ह्ड गोल्ड राखी
या राखीवर तुम्ही तुमच्या भावाचं नावही लिहू शकता. या राखीला पेंडंट म्हणून वापरता येऊ शकतं. त्यामुळे तुमची आठवण त्याच्याजवळ कायमची राहील.
किंमत - ११,४५५
१. डायमंड फ्लॉवर राखी
७ कॅरेट सोनं आणि ७ हिऱ्यांनी या राखीला स्पेशल बनवलं आहे
किंमत - १०,६४९
समस्त बहिणींनो यातली कोणती राखी तुम्हाला आवडली ? आम्हाला नक्की सांगा !!
आणखी वाचा :
२४ कॅरेट सोनं म्हणजे काय ? KDM चे दागिने म्हणजे काय ? राव, तुम्हाला सोन्याबद्दल किती माहित आहे ?