computer

या १२ खड्ड्यांना बघून आपल्या मुंबईच्या खड्ड्यांचा विसर पडेल मंडळी !!

आपण उगाच महानगरपालिकेला नावं ठेवतो की हे लोक रस्त्यावरचे खड्डे बुजवत नाहीत, निकृष्ट दर्जाचं काम करतात, पावसाळ्यात आमचे हाल होतात वगैरे वगैरे...मंडळी मुंबईत कितीही खड्डे असले तरी जगात असे १२ खड्डे आहेत जे बघून तुम्हाला चक्कर येईल.

 

मानव लनिर्मित आणि नैसर्गिक अशा दोन्ही शक्तींनी तयार केलेले हे ‘होल्स’ आजही आपल्याला चकित करतात. चला तर मग आज जाऊया एका अनोख्या सफरीवर आणि पाहूया हे १२ आश्चर्य आहेत तरी काय !!

१. द होल ऑफ ग्लोरी !

कॅलीफोर्नियामध्ये माँटीसिलो धरणा नजीक असलेला हा  खड्डा पृथ्वीच्या गर्भात २०० फुट आत जातो. खरं तर या खड्ड्याची निर्मिती जमा झालेल्या पाण्याला वाहून जाण्यासाठी केली गेली आहे.

२. सॉ मिल सिंक

पुरातत्व खात्यासाठी अत्यंत महत्वाची अशी ही जागा आहे. बहामामध्ये असलेल्या या होलमुळे शास्त्रज्ञांना पृथ्वी हजारो वर्षांपूर्वी कशी होती हे समजण्यास मदत झाली. याची खोली तब्बल ३३.५ मीटर म्हणजे १०९ फुटापेक्षा जास्त आहे.

३. द डीलक्स मिस्ट्री होल

हा खड्डा किती खोल आहे हे अजूनही शास्त्रज्ञांना शोधता आलेलं नाही. सर्व आधुनिक पद्धतीने मोजमाप करूनही या खड्ड्याची खरी खोली कोणालाही मोजता आलेली नाही. हा एवढा प्रचंड खोल खड्डा तयार कसा झाला कुणाला हेही माहित नाही. कदाचित म्हणून या होलला ‘मिस्ट्री होल’ म्हटलं जातं.

४. द डेविल्स सिंकहोल

ही जागा अमेरिकेतल्या टेक्ससमध्ये आहे. हा दिसायला खड्ड्यासारखा जरी असला तरी ती एक प्रकारे गुहा आहे. या गुहेत जाण्यास सक्त मनाई आहे. या तब्बल ४०० फूट खोल गुहेत लाखो वटवाघूळ राहतात.

५. द ग्रेट ब्लू होल

कॅरेबियन सागरात लाईटहाउसच्या मध्यात हा होल आहे आणि ही गुहा ‘आईस एज’ (हिमयुग) दरम्यान तयार झाली असं म्हटलं जातं.  ज्यांना अशा भर समुद्रात पोहोण्याचा थरार आवडतो त्यांच्यासाठी ही जागा बेस्ट आहे. पण मंडळी हा खड्डा तब्बल १००० फुट खोल आहे बरं का!!

६. डीन्स ब्लू होल

बहामामधला हा खड्डा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात खोल ‘ब्ल्यू होल’ म्हणून ओळखला जातो. इथे डायव्हींगचं प्रशिक्षण दिलं जातं.

७. द हारवुड होल

ही एक सरळ पृथ्वीच्या आत असलेली गुफा आहे. न्यूझीलंडमध्ये ही गुफा आहे. खोली तब्बल ३५७ मीटर म्हणजे ११०० पेक्षा जास्त फूट खोल.

८. द मिर माइन

रशियातील सर्वात मोठं हिऱ्यांच स्रोत म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या होलमधून हिरे मिळवले जातात. हिऱ्यांच्या  शोधात तब्बल ५५२ मीटर खोल खड्डा तयार झाला आहे.

९. द उदाच्नाया पाइप

हा होलसुद्धा रशियामध्येच आहे आणि याची निर्मिती देखील हिऱ्यांसाठीच झाली होती. पण खोलीच्या बाबतीत हा होल मीर माईनपेक्षा जास्त म्हणजे तब्बल ६४० मीटर एवढा आहे.

१०. द हेवेन्ली पिट

चीनमधला हा खड्डा जगातील सर्वात खोल सिंकहोल म्हणून प्रसिद्ध आहे. लाखो वर्षांपूर्वी याची निर्मिती झाली. पॅराशुटींगसाठी हे ठिकाण पसंत केलं जातं.

११. बिंघम कॅनियन

ही एक तांब्याची खाण असून जगातील सर्वात खोल मानवनिर्मित माईन म्हणून याला ओळखलं जातं. ही खाण तब्बल ४००० मीटर खोल आहे.

१२. २०१० ग्वाटेमाला सिटी सिंकहोल

भर शहरात तयार झालेला हा सिंकहोल एक आश्चर्य आहे. २०१० मध्ये अगाथा नामक वादळामुळे आणि ज्वालामुखीमुळे या खड्ड्याची निर्मिती झाली. या दुर्घटनेमुळे तीन माजली कारखाना पृथ्वीत गिळला गेला. याची खोली ६५ फुट आहे.

 

 

पण मंडळी काहीही म्हणा आपल्या मुंबईतील खड्ड्यांची बराबरी हे खड्डे करूच शकत नाहीत...बरोबर ना ?

सबस्क्राईब करा

* indicates required