इन्फोसिसमुळे एका दिवसात 30,000 कोटींचे नुकसान ! हादरला शेअर बाजार !

काल इन्फोसिसच्या विशाल सिक्का यांनी आपल्या चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर या पदाचा राजीनामा दिला आणि इन्फोसिसच्या शेअरचा भाव गडगडला. हे गडगडणे गुंतवणूकदारांचे एकूण 30000 कोटीचे नुकसान करून गेले.

 


का दिला राजीनामा ??


स्रोत

इन्फोसिसच्या संस्थापकांनी वारंवार केलेल्या वैयक्तिक टीकेला कटाळून राजीनामा दिल्याचे सिक्का यांचे म्हणणे आहे.


संस्थापक का नाराज होते ?

इन्फीच्या नफ्यात होणारी घट सावरण्यासाठी विशाल सिक्का यांची व्यावसायिक व्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्यात आली होते. या साठी सिक्का यांनी ज्या संकल्पना मांडल्या होत्या आणि अंमलात आणल्या होत्या त्या मूळ संस्थापकांना मान्य नव्हत्या. विशाल सिक्का यांना मिळणारा भरघोस पगार आणि भत्ते हे अव्वाच्या सव्वा आहेत असे त्यांना वाटत होते.


पण हे एकच कारण होते का ??


स्रोत

नाही. विशाल सिक्का यांनी केन्द्रीय मंत्री जयंत सिन्हा यांच्या पत्नीला व्यवस्थापकीय मंडळात घेतले हे जुन्या संस्थापकांना आवडले नव्हते.


सिक्का यांनी पैशाची उधळपट्टी केली असे म्हणतात ते खरे आहे का ?

असे आरोप कंपनीच्या जुन्या व्यवस्थापनाने अनेक वेळा केले आहेत. कंपनीचे CFO बंसल याना नोकरी सोडण्याची भरपाई काही कोटी रुपयात दिली जी अनावश्यक होती.  तसेच कंपनीच्या विकासासाठी ज्या कंपन्या टेक ओव्हर करण्यात आल्या ते सर्व  सौदे महागडे होते .थोडक्यात , कंपनीचे अर्थ नियोजन बेजबाबदारपणे केले असे अनेक आरोप सिक्का यांच्यावर करण्यात आले.


याबद्दल चर्चा बरेच दिवस ऐकीवात होती मग आता अचानक भाव का पडले ?

स्रोत

विशाल सिक्का यांच्या राजीनाम्याला कारण कंपनीचे मूळ संस्थापक नारायण मूर्ती यांचे आरोप आहेत. आताचे व्यवस्थापकीय मंडळ नारायण मूर्ती यांच्यावर नाराज झाले आहे. याचा अर्थ असा की सध्याची मॅनेजमेंट सिक्का यांच्या बाजूने आहे. त्यामुळे विक्रीचा दबाव वाढला आणि शेअर चा भाव गडगडला.


मॅनेजमेंट सिक्का यांच्या बाजूने का उभी आहे ?

विशाल सिक्का यांनी जेव्हा इन्फोसिसची जबाबदारी घेतली तेव्हा त्यांच्या हातात मोठी पूर्वपुण्याई असलेली पण तत्कालीन वातावरणात मागे पडलेली कंपनी आली. नंदन निलेकेणी यांच्यानंतर पहिल्यांदाच कंपनीचा विकास दर या क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या बरोबरीने आला. डॉलरमधला नफा दर तिमाहीला ७.४ टक्क्यानी वाढत गेला. थोडक्यात, विशाल सिक्का यांनी इन्फोसिसला  टीसीएस च्या बरोबरीला नेऊन ठेवले.


आता पुढे काय ?

विशाल सिक्का यांचा वारसदार मार्च 2018 नंतरच सूत्र हातात घेणार आहे . सिक्का तोपर्यन्त काळजीवाहू कार्य करणार आहेत. साहजिकच कंपनीच्या कारभारावर याचा परीणाम होऊन तब्बल सहा महिन्याचा काळ अनिश्चितातेचा असेल. कंपनीचे नफ्याचे प्रमाण घटेल यात काही शंका नाही. परंतू येणारा सीईओ कसा आणि कोण असेल हे या घडीला कळणार नाही. याचा फायदा इतर कंपनया घेतील यात काही शंका नाही.

 

गुंतवणूकदारांना विशेष सूचना


स्रोत

स्वस्तात मिळत आहेत म्हणून इन्फोसिस विकत घेऊ नका. किंवा भाव गडगडले म्हणून हातात असलेले शेअर विकू पण नका. इन्फोसिस सारख्या कंपन्या कधीही चमत्कार दाखवू शकतात. 

 

So Believe in miracles, and god bless you !!

सबस्क्राईब करा

* indicates required