computer

शेंगदाणे खाल्ल्याने होतात हे १० फायदे !

आपल्या रोजच्या जेवणात शेंगदाण्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. घरगुती कांदे पोह्यांपासून, चिक्की, चटणी ते थेट चखण्यातील खारे शेंगदाण्यापर्यंत, शेंगदाणा सगळीकडे फिट बसतो राव. जेवणात तर फिट बसतो पण त्याचे आरोग्यासाठी फायदे देखील खूप आहेत. १०० ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये १ लिटर दुधाएवढं प्रोटीन असतं मंडळी.

व्हिटॅमिन-E, फॉलेट, नियासिन, मॅगनीझ आणि प्रोटीन अशा अनेक हेल्दी घटकांनी भरलेल्या या शेंगदाण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत.

शेंगदाणे खाण्याचे १० फायदे

१. हृदयासाठी फायदेशीर

शेंगदाण्यांमुळे कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं त्यामुळे हृदयाचे विकार उद्भवत नाहीत. एका संशोधनानुसार आठवड्यातून ५ दिवस मूठभर शेंगदाणे खाणे हे हृदयासाठी फायदेशीर असतं.

२. डायबेटीस कंट्रोल करण्यात मदत

संशोधनानुसार शेंगदाणे खाल्ल्याने मधुमेह होण्याचा धोका २१ टक्क्यांनी कमी होतो. शेंगदाण्यात असणाऱ्या मॅगनिझमुळे कार्बोहायड्रेट आणि फॅट नियंत्रणात राहून रक्ताभिसरण आणि साखरेचं प्रमाण संतुलित होतं.

३. पोटाचे आजार

अपचन आणि गॅसची समस्या सोडवण्यासाठी शेंगदाणे फायदेशीर ठरतात. त्याचबरोबर पचनशक्ती वाढीस लागून पित्तासारखे आजार कमी होतात.

४. मेमरी वाढवते

काही गोष्ट लक्षात राहत नसेल तर आपण ‘बदाम खा’ असं म्हणतो. बदाम जसं मेंदूसाठी चांगलं असतं तसंच शेंगदाणे देखील पोषक असतात. शेंगदाण्यात असलेल्या ‘विटामिन बी ३’ मुळे मेंदूकडे रक्ताचा पुरवठा वाढतो

५. गर्भवती महिलांना फायदेशीर

नियमित शेंगदाणे खाल्ल्याने पोटातील बाळाला योग्य ते पोषण मिळते आणि शेंगदाण्यात असणार्या ‘फॉलिक अॅसिड’ मुळे निरोगी बाळाचा जन्म होण्यास मदत होते.

६. वाढत्या मुलांच्या आरोग्यासाठी !

मुलाच्या शरीराचे आरोग्य राखण्यासाठी शेंगदाणे खाणे फायदेशीर असते. शेंगदाण्यात असणाऱ्या ‘अमिनो अॅसिड’मुळे शरीराची वाढ आणि विकास चांगली होते.

७. उर्जेचा स्रोत !

शेंगदाण्यात जीवनसत्त्वे खनिजे, अँटी ऑक्सिडेंट आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असल्याने शेंगदाणे हे उर्जेचा एक उत्तम स्रोत असतात.

८. निरोगी त्वचा !

सुरकुत्या पडणं आणि वृद्धत्वाची चिन्ह दिसू लागणं यावर शेंगदाणे गुणकारी ठरतात. विटामिन C आणि विटामिन E मुळे त्वचा तरुण दिसण्यास मदत होते. शेंगदाण्यामध्ये ओमेगा-6 फॅट भरपूर असल्याने त्याचा त्वचेला फायदा होतो.

९. केस गळणे !

केस गळणे ही एक मोठी समस्या आहे. शेंगदाण्यात ओमेगा-६ प्रमाणे ओमेगा -३ मोठ्या प्रमाणात असल्याने केस गळणे कमी होऊन केसांची चांगली वाढ होते.

१०. नैराश्यातून बाहेर पडण्यास्त मदत !

सेरोटोनीन हे रसायन स्वभावातील बदल नियंत्रणाचे काम करतं. काही कारणाने प्रमाणाबाहेर सेरोटोनीन स्त्रवले जाते माणूस नैराश्येकडे ओढला जातो. शेंगदाण्यात असलेल्या अमिनो अॅसिडमुळे सेरोटोनीन स्त्रावण्याचं प्रमाण काबूत राहतं आणि डिप्रेशन कमी होतं.

 

 

हो, शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे असले तरी अति तेथे माती हे ही लक्षात ठेवा बरं मंडळी...

 

आणखी वाचा :

लसणाचे पाच औषधी गुणधर्म !!

गुळाचे सात औषधी गुणधर्म !!

सबस्क्राईब करा

* indicates required