गुळाचे हे सात औषधी गुणधर्म प्रत्येकाला माहित असायलाच हवेत!!

आपल्या स्वयंपाक घरात अनेक वस्तू अश्या असतात की त्यांचा आहारात समावेश केला की बरेचसे आजार दूर पळून जातात. उदाहरणार्थ, मीठ, हळद, धणे, हिंग, आलं, या सर्व सामान्य अन्न घटकात औषधी गुणधर्म आहेत. आज आपण बघूया गुळाचे गुणधर्म.

 

१. माणसाचे वय त्याच्या चेहेर्‍यावर दिसते. मुरुमं -पुटकुळ्या दिसायला लागल्या की तारुण्य आलं आणि सुरुकुत्या पडल्या की वय झालं हे सगळे माणसाचा चेहेराच सांगत असतो. पण नियमित गुळ खाल्ला तर ही सर्व लक्षणं दिसेनाशी होतात. गुळात असलेली अनेक मिनरल आणि जीवनसत्वं त्वचेचे खर्‍या अर्थाने पोषण करतात.

स्रोत

 

२. आहारात गुळाचा समावेश केला तर पाचन शक्ती सुधारते कारण पचनासाठी आवश्यक असलेली उत्प्रेरकं (एंझाइम) गुळमुळे सहज तयार होतात. झालंच तर सकाळचे सगळे प्रॉब्लेम म्हणजे बध्दकोष्ठ किंवा अतिसार -जंत वगैरे नाहीसे होतात.

स्रोत

 

३. गुळामध्ये लोहाचे प्रमाण बरेच असते त्यामुळे रक्तातल्या लोहाची मात्रा वाढीस लागते. साहजिकच रक्ताच्या किंवा हिमोग्लोबीन च्या कमतरतेमुळे होणारे अ‍ॅनीमीयासारखे आजार होत नाहीत. हिमोग्लोबीन योग्य प्रमाणात असलं की त्वचेला नैसर्गिक तजेला येतोच !

स्रोत

 

४. लोहाच्या सोबत पोटॅशियमचे प्रमाण पण गुळात चांगले असते. त्यामुळे शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण तर राखले जाते आणि स्नायूंना येणारा अशक्तपणा पण कमी होतो. अर्थातच त्याचा परीणाम म्हणजे सहजासहजी थकवा येत नाही.

स्रोत

 

५. पोटॅशियमच्या जोडीस गुळात सोडीयम पण असते. या मुळे शरीरात आम्लाचे प्रमाण काबूत राहते . रक्तदाबासारखे विकार आटोक्यात राहतात. रक्तदाब आटोक्यात असला की भविष्यात उद्भवणारे बरेच आजार दूरच राहतात.

स्रोत

 

६. सेलेनियम हे द्रव्य गुळात नैसर्गिक रुपात असते. सेलेनियम शरीरातल्या अँटीऑक्सीडंटचे प्रमाण वाढवते. ते वाढले की फ्री रॅडीकलचे प्रमाण कमी होते. असे झाले की रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

स्रोत

 

७. श्वसन मार्गाचा दाह आणि जुना दमा हे दोन्ही विकार गुळामुळे कमी होतातच पण वाढीव फायदा असा की शरीराचे तापमान योग्य राखण्यातही गुळाची मदत होते.

स्रोत

 

सबस्क्राईब करा

* indicates required