ऑटोमॅटीक चार्ज होणारं स्मार्टवॉच, किंमत फक्त...

स्मार्टवॉच आणि स्मार्टफोन यांच्यातला कॉमन प्रॉब्लेम म्हणजे बॅटरी. फक्त नावातच स्मार्टफोन.. बाकी बॅटरीच्या नावाने बोंब!! त्यामुळे सारखं सारखं बॅटरी चार्ज करावी लागते. आता यावर जालीम उपाय म्हणून स्वित्झर्लंडच्या Sequent या कंपनीने अश्या स्मार्टवॉच तयार केल्या आहेत ज्यांची बॅटरी स्वतःहूनच चार्ज होते.

गतिमान उर्जा ज्याला शुद्ध मराठीत kinetic energy म्हणतात, याच्या सहाय्याने स्मार्टफोन हातावर असल्या जागीच चार्ज होईल. याला kinetic battery system म्हणतात. सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर घड्याळ वापरणाऱ्या व्यक्तीच्या शरीराच्या हालचालीतून जी गती तयार होईल, त्यातून बॅटरी चार्ज केली होणार आहे..

स्रोत

दिसायला नेहमीच्या घड्याला सारखं असलं तरी हा स्मार्टफोन आहे बरं का! यात सेन्सर्स असून, GPS, Bluetooth तसेच तुम्ही जर वेगवेगळ्या टाईमझोन मध्ये प्रवास करत असाल तर त्या भागातील वेळेनुसार घडीचा काटा आपोआप वेळ दाखवेल. एवढ्या स्मार्टफिचर नंतर घड्याळाची किंमत किती असा?  तुम्ही सवाल कराल.... तर घड्याळाची किंमत आहे १२००० रुपये.

हे स्मार्टफोन अजून विक्रीस आले नसले तरी याबद्दल प्रचंड उत्सुकता तयार झाली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required