computer

जगातले १६ भन्नाट शिक्षक....या शिक्षकांकडे शिकवणी लावणार का?

'छडी लागे छमछम विद्या येई घमघम' हे आता कालबाह्य झाले आहे. ती पिढी मागे पडली. काळ बदलला तसा शिक्षक आणि त्यांची शिकवण्याची पद्धत देखील बदलली. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते जितके प्रेमळ असेल तितके विद्यार्थी मन लावून शिकतात याची अनेक उदाहरणे सांगता येतील.

हे आपल्याला पुलंच्या 'चितळे मास्तर' मधून चांगलेच समजले होते. ज्यांनी 'चितळे मास्तर' प्रकरण वाचलं नसे त्यांच्यासाठी त्या लेखाचा शेवटचा पॅरा जोडत आहोत तो वाचा.

विद्यांर्थ्यांवर आणि शिकवण्यावर प्रेम करणारे अनेक चितळे मास्तर आजही बघायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला काही असे फोटो दाखवणार आहोत, जे पाहून तुम्हाला वाटेल असे शिक्षक आपल्याला भेटले असते तर क्या बात होती!!!

1) या फोटोत शिक्षकांच्या कडेवर एक बाळ दिसतंय?

बाळाला सांभाळण्यासाठी आया ठेवण्याएवढे पैसे नसल्यामुळे आई बाळाला घेऊनच कॉलेजला आली होती. बाळ मध्येच रडायला लागल्यावर त्याला वर्गाच्या बाहेर घेऊन जा असे न सांगता शिक्षकाने बाळाला स्वतःच्या कडेवर घेतलं आणि शिकवणं पण सुरु ठेवलं.

2) परीक्षेसाठी काय काय महत्त्वाचं आहे, असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी शिक्षकांनी टी-शर्ट छापून घेतला आहे.

3) हा फोटो सिद्ध करतो की कुठलेही आडफाटे न ठेवता मोकळेपणाने वर्गात वावरता येते.

4) हा फोटो फॅशन शो मधला नाही

इतिहास शिकवणारे असे शिक्षक असतील तर विषय तोंडपाठ होणार यात शंका नाही.

5) परीक्षा सुरू असताना इतका भन्नाट मॅसेज समोर असेल तर विद्यार्थी टाइमपास न करता पटापट उत्तरे सोडवतील.

6) फिजिक्स (भौतिकशास्त्र) सारखा विषय सोपा करून कसा शिकवावा ते या शिक्षकाकडून शिकावे.

7) फळा इतका सुंदर बनविण्याची क्षमता फक्त कलेचा शिक्षकच राखून असतो.

8) मुलांना रट्टे मारायला सांगण्याऐवजी समोर दिसेल ती वस्तू वापरून प्रॅक्टिकल पद्धत वापरली तर मुलांना परीक्षेत अडचण येणार का?

9) या शिक्षकांनी सांगितले होते की जर सर्व मुलांना चांगले मार्क्स मिळाले तर ते स्कूबी-डूचा वेष करतील आणि सर्व मुलांना नॉन अल्कोहोलिक शँपेन पाजतील.

...आणि काय आश्चर्य, मुलांनी चांगले मार्क्स आणले आणि हे घडलं. बक्षीस असावे तर असे.

10) विद्यार्थी झोपलाय त्याला उठवायचे पण नाही आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना मेसेज पण द्यायचाय ? मग या सरांची पद्धत बघा.

11) या बाईंना शाळेत एक मांजरीचे पिल्लू सापडले आता तिची पण शिकवणी सुरू आहे.

12) भूगोल बोरिंग वाटत असेल तर या सरांच्या वर्गात एकदा बसायला हवे.

13) आपल्या दाढीवर गणितातील π 'पाय' कोरून आणणारे शिक्षक किती भन्नाट असतील नाही?

14) हे फिजिक्सचे आणखी एक भन्नाट सर. वर्गातच प्रयोग करून विषय आणखी सोपा करत आहेत.

15) या मॅडमांनी स्वतःच्या ड्रेसवर मुलांची डोक्यालिटी वापरायला सांगितली. पुढे काय झाले तुम्ही बघू शकता.

16) शिक्षकांपासून तुम्ही काहीही लपवू शकत नाही हेच इथे सिद्ध होते.

असे जगावेगळे शिक्षक तुम्हाला लाभले होते का? तुमचे अनुभव शेअर करा!!

सबस्क्राईब करा

* indicates required