computer

दृष्टिभ्रम करणारे हे २१ फोटो पाहून आपलेच डोळे चोळावे लागतील

ऑप्टिकल इल्यूजन म्हणजेच दृष्टिभ्रम ही डोळयांना आणि मेंदूला एकाच वेळेला गोंधळात टाकणारी गोष्ट. दृष्टिभ्रम करणारे फोटो आणि व्हडिओ हे नेटकरांसाठी नवीन नाहीत. हे पाहत असताना आपले डोळे एक गोष्ट पाहतात आणि आपला मेंदू त्याला काही दुसरंच मानतो. त्यामुळे काही ऑप्टिकल भ्रमांचे डीकोडिंग करणे खूप अवघड असते. वास्तविक जेव्हा आपण एखाद्या प्रतिमेकडे पाहतो तेव्हा आपल्या मेंदूत शक्य तितक्या सोप्या पद्धतीने ती कोणती आहे याचा विचार करतो. पण अश्या काही प्रतिमा असतात ज्या गोंधळात टाकतात. दृष्टी भ्रम करणाऱ्या प्रतिमा किंवा व्हिडीओ मेंदू आणि डोळ्याचा अगदी कस पाहतात. शेवटी कधीकधी वाटते, जाऊदे सगळा गोलमाल आहे. पण आज आम्ही दृष्टिभ्रमाची अशी काही निवडक उदाहरणे आणली आहेत, यातली कोणती तुम्हाला खरोखर गोंधळवून टाकतात आम्हाला नक्की सांगा.

१. या फोटोमध्ये नीट पहा.

यात चार बाटल्या दिसत आहेत, पण चार हात दिसतात का?

२. हा फोटो अगदी साधा वाटतोय ना?

पण यामध्ये तुम्ही यापूर्वी कधी पाहिला नसेल तो रंग पाहाल. यासाठी लाल वर्तुळात मध्यभागी असणारा तो पांढरा बिंदू निरखून पाहावा लागेल आणि तोही जवळपड ३० सेकंद. त्यानंतर तुम्ही तुमचे डोळे घट्ट बंद केले तर तुम्हाला फिक्या निळसर रंगात “चमकणारा ओर्ब” दिसेल. तो नक्की कसा दिसेल याविषयी यूट्यूब वर एक व्हिडिओदेखील आहे. एकदा करून पाहाल तर खूप वेगळा अनुभव येईल.

३. हा व्हिडीओ नीट पाहून घ्या. यात कोकाकोलाचे किती कॅन वापरले गेले आहेत?

या दृष्टीभ्रमाला 'द रीअल थिंग' म्हणतात. यामध्ये कोका-कोलाचे कॅन आणि आरसा वापरले आहेत. मॅट प्रिचर्ड नावाच्या ब्रिटिश माणसाने हे तयार केले होते. व्हिडिओ येथे पहा.

४. हा व्हिडिओ तर चक्रावून टाकणारा आहे. पुलावरून वाहने कुठे गायब होतात?

 सोशल मीडियावर ट्रेंड झालेल्या या व्हिडिओमध्ये एका पुलावरील सगळ्या गाड्या वळल्यावर अचानक अदृश्य होतात. गाड्या नदीकडे जाताना दिसत आहेत. पण प्रत्यक्षात हा पूलच नाही. तो नेहमीसारखा रस्ता आहे आणि व्हिडीओ काढणारा पार्किंगच्या छतावर आहे. गाड्या पार्किंगमध्ये जात आहेत.

५. मुलगी एका तळहाताने दुसर्‍या हातात जाताना दिसते!

 

या व्हिडिओमध्ये एक मुलगी आपल्या तळहाताने काहीतरी खेळते आहे. उघडझाप करताना अचानकच दिसते की ती एका हाताने दुसऱ्या हातात गेली. म्हणजे हात आरपार कसा घुसतो? नीट पाहून घ्या ही ट्रिक. डोळ्यांना विश्वास बसणारच नाही.

६. पळणारा माणूस का कुत्रा? नेमकं कोण आहे पाहा!

या फोटोत पहिल्यांदा पाहिलेत तर बर्फाळ डोंगरात बॅकपॅक घातलेला एक माणूस पळताना दिसतोय. पण काही सेकंद निरखून पाहिलंत तर एक काळा कुत्रा बर्फातून पळत येताना दिसतो.

७. हा असा ब्लर फोटो का टाकलाय असा विचार करत असाल तर काही क्षण थांबा.

कारण ३० सेकंद फोटोवर लक्ष केंद्रित केलंत तर तो पूर्णपणे अदृश्य होईल.
 

८. पार्कातल्या बेंचवर बसलेल्या महिला आहेत का? यामध्ये तीन महिला पार्कच्या बेंचवर बसलेल्या दिसत आहेत...

पण नीट लक्ष देऊन पाह्यलंत तर बेंचवर बसण्याची जागाच दिसत नाहींये. पहिल्यांदा पाहिल्यावर दिसलं का नाही? .
 

९. हा वर्तुळांचा संच पूर्णपणे न हलणारा आहे. एक स्थिर फोटो.

पण काही क्षणात ती वर्तुळे फिरताना दिसतील. एक आश्चर्यकारक दृष्टभ्रम.

१०.ही मांजर पायर्‍या चढून जातेय की खाली जात आहे?

पहिल्यांदा पाहिल्यावर वर चढताना दिसते, पण थोड्यावेळात ती खाली उतरताना दिसते.

११. मिठी मारणार्‍या दोन जणांचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता.

प्रत्यक्ष कोण बसले आहे, स्त्री की पुरुष? खूपच संभ्रमात टाकणारे आहे ना!

१२. या बुटाचा खरा रंग ओळखा!

हा गुलाबी आहे का पांढरा की राखाडी? खरंच कळणार का!

१३. या फोटोमध्ये एकूण किती काळे बिंदू दिसतात?

यात खरेतर १२ बिंदू आहेत, परंतु आपल्याला ते एकाच वेळी दिसत नाहीत. कितीही प्रयत्न करून बघा.

१४. या फोटोत राखाडी रेषा दिसतात का?

 पाहिल्या तर त्या तिरप्याच दिसत आहेत. परंतु त्या प्रत्यक्षात पूर्णपणे समांतर आहेत.

१५. तुम्ही फोन शोधण्यात तरबेज आहात ना?

मग या चित्रात लपलेला फोन शोधून काढू शकता का? प्रयत्न करा.

१६. हा फोटो नेमका कसला वाटतोय?

एक कवटी आहे की बसलेली महिला?
 

१७.यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला काय दिसले?

पुरुष का स्त्रिया?

१८. ही कोणती अनिमटेड जीआयएफ इमेज नाही बरका!

प्रत्यक्षात इमेज पूर्णपणे स्थिर आहे. पण काही क्षणांत ती हलताना दिसते ना!
 

१९. बदक किंवा ससा?

या फोटोत एकदा पाहिलंत तर ससा वाटतोय पण नंतर बदकही वाटतोय.

२०. या फोटोमधील वर्तुळांचा रंग ओळखा!

पिवळा, गुलाबी, हिरवा? की रंग बदलतोय!!
 

२१ या फोटोत फक्त एक म्हातारा माणूस आहे की यात बरेच चेहरे आहेत?

स्त्री आहे?उभा असलेला काठी घेतलेला म्हातारा माणूस अजून किती व्यक्ती दिसत आहेत तुम्हाला?

इतके फोटो एकदम पाहिल्यावर गरगरल्या सारखं होतंय का? गोंधळून नका जाऊ . यातला कुठला दृष्टी भ्रम सर्वात जास्त चॅलेंजिंग वाटतोय? कमेंट करून सांगा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required