स्टीव जॉब्सचा ‘वर्जीनल’ कंप्यूटर विकला एवढ्या मोठ्या किमतीला....किंमत बघून चक्रावून जाल राव!!

अॅपल कंपनीची लोकप्रियता बघता आणि ‘स्टीव जॉब्स’ अजूनही स्मरणात असताना ४० वर्षांपूर्वी ‘स्टीव जॉब्स’ आणि ‘स्टीव वॉझनिक’ यांनी तयार केलेला “अॅपल-१” या कंप्यूटरला लिलावात विकण्यात आलंय. त्याकाळात $६६६.६६ (४३००० हजार) एवढ्या किमतीचा कंप्यूटर आजच्या घडीला २.३ करोड इतक्या भक्कम किमतीला विकला गेलाय.

अॅपल-१ हा कंम्प्युटर प्रथम १९७६ साली तयार करण्यात आला. त्यावेळी  एकूण २०० कंम्प्युटर बनवण्यात आले होते. त्यापैकी ६६ कंम्प्युटर आजच्या काळात उरलेत. उरलेल्यांमधलाच हा एक कंम्प्युटर आहे. आता विशेष म्हणजे ४० वर्षानंतरही हा संगणक चालू स्थितीत आहे राव.

मंडळी याला म्हणतात अॅपल ‘वर्जीनल’...!!

सबस्क्राईब करा

* indicates required