चला जाऊया जगातल्या सर्वात मोठ्या गुहेच्या सफरीवर...जमिनीच्या आत असलेली अद्भुत दुनिया !

आज आम्ही तुमची ओळख एका अद्भुत जागेशी करून देणार आहोत. मंडळी ही जागा इतकी विशाल आहे की तुम्ही चक्रावून जाल. जवळ जवळ ६ किलोमीटर लांब, ६५६ फूट उंच आणि २६२ फूट विस्तीर्ण अशी ही जगातली सर्वात मोठी गुहा आहे. ही गुहा काही ठिकाणी ४९२ फूट इतकी विस्तीर्ण होते.

Sharing by john spies on 500px

इतक्या प्रचंड आकाराच्या या गुहेत २ किलोमीटर लांब एक नदी वाहते. इतकंच नाही तर आत मोठं जंगल आहेच, पण गुफेचं बदलणारं स्वतंत्र हवामान देखील आहे. ही गुहा आहे व्हिएतनामच्या घनदाट जंगलात. या गुहेला ‘सॉन  डुंग’ असं म्हटलं जातं.

गुहेचा शोध कसा लागला ?

Underground forest by john spies on 500px

111516700

१९९१ साली या गुहेचा शोध तिथल्या भागात राहणाऱ्या ‘हो खान’ या माणसाला लागला.  परंतु गुहेचं खरं रूप जगासमोर यायला तब्बल १८ वर्ष जावी लागली. कारण गुहेच्या आतून येणारा पाण्याचा प्रचंड आवाज यायचा आणि अंधारामुळं लोक या गुहेत जाण्यास घाबरत होते. ब्रिटीश गुहा संशोधक हॉवर्ड लिम्बर्ट यांना हो खान यानं जंगलात मोठी गुहा असल्याचं सांगितलं होतं. पण हो खानला स्वत:लाच ही कल्पना नव्हती की गुहा नेमकी किती मोठी आहे. त्यानंतर २००९ साली हॉर्वर्ड लिम्बर्टनं ‘ब्रिटिश केव रिसर्च एसोसिएशन’ बरोबर मिळून या गुहेच्या आतल्या रहस्याचा उलगडा केला आणि पहिल्यांदा जगाला या प्रचंड गुहेबद्दल कळलं.

 

'सॉन डुंग’ गुहेचं अवाढव्य रूप !!

111516683

111516705

त्यात असणाऱ्या अनोख्या गोष्टींवरून गुहा किती मोठी असावी याचा अंदाज येतो. गुहेच्या आत वरचा भाग कोसळल्यामुळं तिथे सूर्यप्रकाश येतो आणि यामुळंच तिथं दाट जंगल तयार झालंय. गुहेच्या आत अशी दोन जंगलं आहेत. आत वाहणाऱ्या नदीमुळं आणि अनुकूल वातावरणामुळं इथं एक अनोखी वेगळी जीवसृष्टी तयार झाली आहे. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण गुहेच्या आत ढग दाटून येतात  हो मंडळी... गुहेचं आणखी एक अनोखेपण म्हणजे इथं लाखो वर्ष जुने जीवाश्म सापडले आहेत.

Hang Son Doong skyhole by john spies on 500px

Lighting the dark by john spies on 500px

111516701

सॉन डुंग गुहेचा शोध लागल्यानंतर साहसी मोहिमेत रस असणारी प्रत्येक व्यक्ती इकडे ओढली गेली. तेव्हापासून गुहेला भेट देण्याबाबत काही नियम लागू केलेत. इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून ७ दिवसाच्या टूरसाठी १ लाख ८३ हजार इतकी रक्कम घेतली जाते, १ महिन्यात फक्त एकच टूर आयोजित केली जाते आणि एका टूर मध्ये फक्त ८ जणांना प्रवेश मिळतो. या टूरमध्ये तुम्हाला ट्रेकिंग ते पर्वतारोहण असे सर्व अनुभव मिळत असल्यानं साहसी लोकांसाठी ही पर्वणीच असते.

 

(सर्व फोटो स्रोत)

सबस्क्राईब करा

* indicates required