computer

आधी प्रचंड महाग असणारे पण आता स्वस्त झालेले 7 भन्नाट स्मार्टफोन्स !!

तुमच्यापैकी असा कुणीही नसेल की त्याला चांगला स्मार्टफोन आवडत नाही. पण सगळे चांगले स्मार्टफोन परवडत नाहीत ना राव!! मंडळी प्रत्येकाची गत आहे. चांगला स्मार्टफोन पण घ्यायचा आहे पण खिशाला कात्री लागेल याची भीती पण आहे. तर मंडळी आम्ही काही भन्नाट फोन्सबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. अगदी तुमच्या बजेटमध्ये बसेल असे एक से बढकर एक स्मार्टफोन्स आम्ही घेऊन आलोय. चला तर बघूया.

1) ऍसूस मॅक्स प्रो एम 1

मंडळी हा फोन लाँच झाला तेव्हा त्याची किंमत होती 11 हजार पण सध्या हा फोन फक्त 8 हजारमध्ये विकला जात आहे. ऍसूसचा फोन वापरणे हा चांगला अनुभव आहे हे तुम्हाला कुठल्याही ऍसूसचा ग्राहक सांगेल!! वरून हा फोनमध्ये अनेक भारी फिचर्सचा समावेश आहे. कॅमेरा आणि बॅटरी बॅकअप तगडा आहे. 

6 इंचची स्क्रीन असलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर तसेच अड्रेनो 509 चा समावेश आहे.

2) Xiaomi poco F1

हा फोन सुरुवातीला 20 हजारात विकला जात होता पण आता याची किंमत उतरून 18 हजार झाली आहे. ज्यांनी हा फोन विकत घेतला त्यांनी अतिशय छान फोन म्हणून रिव्ह्यूज दिले आहेत. एकंदरीत पैसा वसूल फोन या कॅटेगरीत हा मोबाईल येतो.

6.8 इंच स्क्रीनसोबत Ips lcd पॅनल असणारा हा फोन 20 Mp कॅमेऱ्याने सज्ज आहे. 4000 mah बॅटरी बॅकअप आणि 845 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर यामुळे हा फोन भन्नाट आहे राव!!

3) वन प्लस 6T

सुरवातीला हा फोन 47 हजारात विकला जात होता पण आता तब्बल 14 हजार कमी होऊन त्याची किंमत फक्त 32 हजार झाली आहे. मागच्या वर्षी या फोनने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला होता. 6.41 इंच अमोल्ड पॅनलच्या स्क्रीनसोबत ऑक्सिजन ओएस म्हणजे सोने पे सुहागा राव!! या फोनच्या कॅमेरा क्वालिटीची तर सगळीकडेच चर्चा आहे राव!! 3700 mah बॅटरी आणि 20 व्हॅट फास्ट चार्ज यामुळे बॅटरीचा पण विषय निकाली निघतो...

4) सॅमसंग गॅलक्सी S9 प्लस

हा फोन पण लॉन्च झाला तेव्हा याची किंमत 68 हजार होती पण सध्या हा 46 हजार 500 रूपयांमध्ये मिळत आहे. म्हणजेच मुळ किमतीपेक्षा तब्बल 22 हजार कमी!! मंडळी सध्या हा फोन ज्या किमतीत मिळत आहे. त्याने हा फोन एकेक रूपया वसूल करून देईल हे निश्चित.

कंपनीने याला एक्सिनॉस 9810 प्रोसेसर आणि MALI G72 gpu यांनी सज्ज केले आहे. 12+12 चा कॅमेरा आणि 3500 mah ची बॅटरी बॅकअप यामुळे हा फोन आपल्यासाठी परफेक्ट आहे.

5) आयफोन एक्स

लॉन्च झाला त्यावेळी 90 हजार किंमत असलेला हा फोन सध्या फक्त 69 हजारात मिळत आहे. आयफोनच्या चाहत्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. चांगल्या क्वालिटीचा आयफोन पण पाहिजे पण जास्त पैसे पण जायला नको अशी ईच्छा असणाऱ्यांसाठी हा फोन बेस्ट आहे.

बॅटरी बॅकअप, कॅमेरा, प्रोसेसर अशा सगळ्या बाबतीत हा फोन भन्नाट आहे.

6) LG G7 ThinQ

हा फोन सध्या तुम्हाला 25 हजारमध्ये मिळेल मंडळी!! त्याआधी तो 40 हजारात विकला जात होता.

LG तर्फे मार्केटमध्ये आलेल्या सर्वात बेस्ट मोबाइल्सपैकी हा एक आहे. क्वालकम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसरसोबत अड्रेनो 630 gpu याने सज्ज आहे. 16+16 चा सेंसर कॅमेरा आणि 3000mah ची बॅटरी ही त्याची अजुन काही वैशिष्ट्य आहेत.

7) गुगल पिक्सल 3XL

लॉन्च प्राईज 83 हजार असलेला हा फोन 54 हजार 500 रूपयांमध्ये विकला जात आहे.

या फोनचे सर्वात भारी वैशिष्ट्य म्हणजे भन्नाट इमेज प्रोसेसिंग टेक्नोलॉजी!! फोटोग्राफीची आवड़ असणाऱ्यांसाठी तर हा फोन म्हणजे पर्वणी आहे राव!!

या फोन मध्ये क्वालक्म स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर आणि 3430 बॅटरी बॅकअप आहे.

 

तर मंडळी, हे आहेत सुरुवातीला महाग असणारे पण आता अतिशय स्वस्त किमतीत मिळणारे फोन...तुम्ही कोणता घेणार ?

सबस्क्राईब करा

* indicates required