computer

भेटा अमेरिकन सावित्रीला....ज्वालामुखीत पडलेल्या नवऱ्याला तिने मृत्युच्या दाढेतून खेचून आणलं!!

मंडळी आपल्याकडे सावित्रीने तिच्या पतीला मरणाच्या दारातून परत आणले अशा गोष्टी सांगितल्या जातात. आजही अनेक वेळा आपल्या नवऱ्याला मरणाच्या दारातून परत घेऊन येणाऱ्या स्त्रिया आजुबाजूला पाहायला मिळतात. पण परदेशात लग्न म्हणजे एक काँट्रॅक्ट असते अशी तुमच्या मनात इमेज असेल, पण ते किती खोटं आहे हे एका आधुनिक अमेरिकन सावित्रीने सिद्ध केले आहे. 

मंडळी, फ्लोरिडाचे क्ले चेस्टन आणि त्यांची बायको एकॅॅमी हनिमूनसाठी कॅरेबियन समुद्राच्या सहलीवर गेले होते. तिथल्या माऊंट लियमायगा पर्वताच्या सेंट किट्स नावाच्या शिखरावर ते फिरत असताना क्ले चेस्टन एका ५० फूट खोल ज्वालामुखीत पडले. त्या बिचाऱ्या बाईचे या घटनेने सगळे अवसान गळून पडले राव!! पण तिने हिंमत न सोडता शेवटी तिच्या नवऱ्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणले. 

कॅरेबियन समुद्राच्या जवळ लियमायगा पर्वत आहे. कॅरेबियन समुद्र फिरायला गेलेला माणूस त्या पर्वताची पण सफर करतोच !! क्ले चेस्टन पण हनिमूनचा आनंद घेत असताना सेंट किट्स शिखर चढत होते. शिखर सर करत असतानाच ले चेस्टन यांचा पाय निसटला आणि ते खोल अशा ज्वालामुखीत जाऊन पडले. मंडळी आपल्याकडे सुद्धा दऱ्या खोऱ्यात, कड्या कपाऱ्यांवरून पडून भटक्या मंडळींचे होणारे अपघात तुम्हाला माहीत असतीलच. आजूबाजूला मदतीला कुणी असले तर माणसाचा जीव वाचवता येतो, अन्यथा खूप मोठी दुर्घटना व्हायची शक्यता असते राव!!

चेस्टनसोबत पण तेच झाले. ते जेव्हा ज्वालामुखीत पडले तेव्हा त्यांच्या आजूबाजूला मदतीसाठी कुणी नव्हते. अशावेळी काय करावे हे त्यांच्या बायकोला कळेना. पण त्यांनी धीर सोडला नाही. त्यांनी प्रचंड प्रयत्न करून एकटीने त्यांच्या नवऱ्याचे जीव वाचवले. क्ले चेस्टन बाहेर तर आले पण ते खूप जखमी झाले होते राव!!  बायकोने त्यांना तिथून दोन किलोमीटर दूर असलेल्या आपल्या बेसवर  नेले, तिथून तब्बल २० लाख रुपयांचे मेडिकल प्लेन बुक करून दोघे थेट फ्लोरिडाला गेले व तिथे क्ले यांचा उपचार केला. सध्या क्ले यांची तब्येत चांगली आहे राव!! 

क्ले चेस्टन सांगतात की ते जेव्हा शिखर चढत होते तेव्हा तिथे असलेली हिरवळ त्यांना आवडली आणि ती हिरवळ अजून जास्त कशी पाहता येईल या आशेने ते खाली खाली उतरत गेले. अचानक घसरणीला पाय घसरल्याने ते थेट ज्वालामुखीत जाऊन पडले. पडल्यावर त्यांचे डोके एका कपारीला ठोकले गेल्याने ते जखमी झाले.

एकॅॅमी सांगतात की डोक्याला जोरदार दुखापत झाल्याने क्ले यांच्या डोक्यातून खूप रक्त वाहत होते. ते जिवाच्या आकांताने ओरडत होते, पण आजूबाजूला मदतीला कुणीच नव्हते. तिथे मोबाईलची सुद्धा रेंज नव्हती. अशा परिस्थितीत एकॅॅमी यांनी स्वतः सूत्रे हातात घेतली. बाहेर काढल्यावर क्ले यांना बसपर्यंत नेण्यापासून तर सगळी कामे त्यांच्या बायकोनेच केली. 

क्ले यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्त वाहून गेल्याने त्यांना रक्ताचा पुरवठा करावा लागला. आता क्ले यांची तब्येत चांगली असल्याचे बोलले जात आहे.

पाह्यलंत, गरज पडली तर या अबला समजल्या जाणाऱ्या बायका पण काहीही धाडस करू शकतात. तुमच्या आसपास पण अशी कुणी धाडसी गोष्ट असेल तर आम्हांला कमेंटबॉक्समध्ये जरूर कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required