हा मेकअप आहे की फोटोशॉप ? तुम्हीच ठरवा !!

मेकअप हा प्रकार फक्त छान छान दिसण्यासाठी असतो ही संकल्पना आता बदलत आहे राव. अमिताभ आजोबांचा ‘पा’ सिनेमातील लुक असेल, गेल्यावर्षी आलेला राबता सिनेमातला राजकुमार रावचा लुक असेल किंवा रजनीकांत तात्याच्या प्रत्येक सिनेमात त्याचं वय निदान ३० वर्षांनी कमी दिसणारा लुक असेल. या सगळ्यांमधून मेकअप म्हणजे एक कला आहे हे आपल्यासमोर येतं.
आता तुम्ही म्हणाल आज हे मेकअप-मेकअप काय चाललंय? त्याचं कारण म्हणजे एका मेकअप आर्टीस्टने केलेलं भन्नाट काम. आधी आपण तिच्या कामाची एक झलक बघू आणि मग तिच्या बद्दल जाणून घेऊ.
बघितलं ? तोंडात बोटे गेली ना?
मंडळी या कलाकाराचं नाव आहे ‘मिमी चोई’. ती कॅनडामध्ये राहाते आणि मेकअप आर्टीस्ट म्हणून काम करते. ती तिच्या मेकअपच्या जादूने चेहऱ्यावर अशी काही कलाकारी करते की आपण फक्त बघत राहतो. गंमत म्हणजे तिने हा प्रयोग स्वतःच्या चेहऱ्यावर केला आहे. काहींना हा फोटोशॉप वाटू शकतो, पण खरं तर तिने हे स्वतः तयार केलं आहे.
सुरुवातीला ती शिक्षिका म्हणून काम करत होती. पण त्या कामात मन न रमल्यामुळे ती आपल्या आवडीकडे वळली. या क्षेत्रात आल्यानंतर तिने एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आणि तिथूनच या कलाकारीची सुरुवात झाली. ती जवळजवळ ५ तास आपल्या चेहऱ्यावर काम करते. तिनेच सांगितल्या प्रमाणे ‘माझा चेहरा हा एक प्रकारे कॅनव्हास आहे, ज्यावर मी माझ्या कलेचे प्रयोग करत असते.'
चला तिच्या कलाकारीचे आणखी काही भन्नाट नमुने बघूया.