computer

अमेझॉन अकॅडमी: स्पर्धा परीक्षांची मोफत पुस्तके, सराव परीक्षा, ऑनलाईन अभ्यास....आणखी काय काय देणार आहे अमेझॉन?

JEE च्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे.  अमेझॉन इंडिया (Amazon India) हे नाव आता सर्वाना ओळखीचे आहे. पण आता ही फक्त शॉपिंगशी मर्यादित साईट नसून त्यांनी शिक्षणक्षेत्रात एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. याचा फायदा देशभरातल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. 

नुकतंच अमेझॉन इंडियाने अमेझॉन अकॅडमी सुरू केल्याची घोषणा केली आहे. जेईई (JEE) च्या परीक्षेच्या तयारीसाठी मुलांना मदत व्हावी म्हणून अमेझॉन अकॅडमीची सुरुवात केली असल्याचे अॅमेझॉन इंडियाने सांगितलं आहे. या बुधवारीच त्यांनी ही घोषणा केली आहे.

जेईई अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना खास परीक्षेच्या तयारीसाठी तज्ज्ञांकडून हे स्टडी मटेरियल तयार करण्यात आलेले आहे. त्यामध्ये १५ हजाराहून अधिक प्रश्न असणार आहेत, तसेच ते सोडवण्याची सोपी पद्धत, काही टिप्स आणि विस्तृत उत्तरेही त्यात असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरून अभ्यास करणे अजून सोपे होणार आहे.

याचा फायदा फक्त जेईईचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनांच मिळणार नाही, तर बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड सायन्स (BITSAT), वेल्लोर  इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VITEEE), एसआरएम  इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी (SRMJEEE) च्या विद्यार्थ्यांनाही होणार आहे. हे स्टडी मटेरियल देशातल्या अनेक शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने तयार करण्यात आले आहे.

अमेझॉन अकॅडमीचे हे स्टडी मटेरियल विदयार्थ्यांसाठी सध्यातरी अगदी मोफत उपलब्ध आहे.  पुढील काही महिन्यांपर्यंत हे मोफत असेल. याचे बीटा व्हर्जन सध्या वेबवर आणि गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध आहे. 

जसे सध्या ऑनलाइन पध्दतीनं शाळा कॉलेज सुरू आहेत त्याच पद्धतीने अमेझॉन अकॅडमीही जेईईच्या परीक्षेसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची तयारी ऑनलाइन पध्दतीनेच करुन घेणार आहे. गणित, फिजिक्स आणि केमेस्ट्री या विषयातील सर्व स्टडी मटेरियल उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी नियमित सराव परीक्षा आणि क्रॅश कोर्स सुरु करण्यात येणार आहेत. लाईव्ह क्लासेसही लवकरच सुरू होणार आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निसरन होईल.

गावोगावी विद्यार्थांना महागडे क्लास लावणे शक्य होत नाही पण असे जर अभ्यासाचे मटेरियल त्यांच्यापर्यंत पोहोचले तर त्यांना नक्कीच मदत होईल.

ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचायला जास्तीत जास्त शेयर करा.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required