computer

'लिओनार्डो दा विंची'च्या चित्रातील उलगडा न झालेली ५ रहस्य...

जगप्रसिद्ध चित्रकार 'लिओनार्डो दा विंची'च्या चित्रांचा अर्थ आजही पूर्णपणे उलगडता आलेला नाही. त्याच्या चित्राइतकेच त्याचे जीवनही गूढ होते. लिओनार्डोची अनेक चित्रे त्याकाळात वादग्रस्त ठरली. म्हणूनच कदाचित तो आयुष्याच्या शेवटी म्हणाला होता, “मी या जगाचा आणि देवाचाही गुन्हेगार आहे कारण, मी ज्या दर्जाचे काम करायला हवे होते त्या दर्जाचे काम माझ्या हातून झाले नाही.” कदाचित आपल्याच चित्राबाबत तो समाधानी नव्हता. लिओनार्डोची काही चित्रे पाहून आजही अनेक प्रश्न पडतात. त्याची अशीच काही चित्रे आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न याची या लेखात चर्चा करणार आहोत.

साल्वाडोर मुंडी

साल्वाडोर मुंडी हे लिओनार्डोच्या अनेक गाजलेल्या चित्रांपैकी एक. या चित्रात येशू आपल्या एका हातात एक पारदर्शी चेंडू घेऊन उभा आहे आणि दुसरा हाता वर केला आहे. लिओनार्डो नुसता चित्रकार नव्हता तर तो संशोधकही होता. ऑप्टीक्सचे नियम लिओनार्डोला चांगलेच माहिती होते तरीही हा पारदर्शक गोल दाखवताना त्याची पार्श्वभूमी अशी दिसणार नाही हे लिओनार्डोच्या लक्षात आले नसेल का? त्या गोलातून दिसणारा मागचा भाग थोडासा मोठा आणि अस्पष्ट दाखवायला हवा होता.

द लास्ट सपर

लिओनार्डोचे सगळ्यात जास्त गाजलेले आणि वादग्रस्त ठरलेले चित्र, द लास्ट सपर. येशूचे निधन होण्यापूर्वी येशू आपल्या शिष्यांसह जेवण घेत असतो आणि तुमच्यापैकी एक जण मला धोका देणार असल्याचे भाकीत तो यावेळी करतो. येशूच्या या शेवटच्या क्षणाची कल्पना करून लिओनार्डोने हे चित्र रेखाटले होते. या चित्रात येशू आणि जुडास या दोघांसाठीही एकच मॉडेल वापरला असल्याचे नंतर उजेडात आले. लिओनार्डोला या चित्रातील येशूसाठी जो मॉडेल सापडला तो चर्चच्या वाद्यवृंदातील कलाकार होता. नंतर त्याच मॉडेलला घेऊन त्याने जुडासचे चित्र काढले. त्या मॉडेलच्याच नंतर हे लक्षात आले की लिओनार्डोने दोन्हींसाठी आपल्यालाच मॉडेल म्हणून उभे केले होते.

‘द लास्ट सपर’ मधील आणखी एक बारकावा तुम्ही लक्षात घेतला आहे का? या चित्रात जुडासच्या शेजारी जो येशूचा शिष्य बसला आहे, त्याच्याहातून मीठ सांडले आहे. कोणत्याही क्षणी मीठ सांडणे हे अशुभाचे संकेत समजले जाते. कदाचित या चित्रातून लिओनार्डोला देखील हेच अधोरेखित करायचे होते का? कारण या चित्रात येशू याचवेळी सांगतो की तुमच्यापैकी कुणीतरी माझा घात करणार आहे.

‘द पोर्ट्रेट ऑफ इसाबेला दि’इस्टेट’

‘द पोर्ट्रेट ऑफ इसाबेला दि’इस्टेट’ हे चित्र अलीकडेच सापडले आहे. शास्त्रज्ञांनी जेंव्हा या चित्राची तपासणी केली तेंव्हा त्यांना असे आढळले की या चित्रासाठी वापरण्यात आलेले रंग आणि या चित्रातील रंगांचे प्राथमिक आवरण हे लिओनार्डोच्या चित्रांशी मिळते जुळते आहे. शिवाय लेडी इसाबेलाचे हास्य देखील मोनालिसाच्या हास्याशी जुळणारे आहे, त्यामुळे हे चित्रही लिओनार्डो दा विंचीचेच आहे असा संशोधकांचा दावा आहे.

‘लेडी विथ अॅन एर्मीन’

या चित्राची पुनर्पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत संशोधकांना जे दिसले ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या चित्राचे आज जे आपल्याला अखेरचे रूप दिसते आहे, त्यापूर्वी या चित्राच्या दोन आवृत्त्या रेखाटल्या होत्या. त्याही एकाच कॅनव्हासवर. या चित्राच्या पहिल्या आवृत्ती एर्मीन दिसत नाही. आणि दुसऱ्या आवृत्तीत एर्मीन सोबत इर्मिने प्राणी दाखवला होता.

लिओनार्डोच्या चित्रकृती आजही आपल्याला अचंबित करतात. चित्रांखेरीज त्यांचे चरित्रही तितकेच गूढ होते. लिओनार्डोने आपल्या आयुष्यभरात जेवढी कामे केली त्या प्रत्येकाकडे बघितल्यास अचंबित व्हायला होतं. लिओनार्डोबद्दल सविस्तर वाचण्यासाठी आमचा हा लेख नक्की वाचा. 

दिनविशेष : 'लिओनार्दो दा विंची' यांच्या बद्दल या १० गोष्टी माहित आहेत का ?

 

लेखिका : मेघश्री श्रेष्ठी

 

सबस्क्राईब करा

* indicates required