computer

ऍपल वॉचमुळे ६० वर्षीय वृध्दाचा जीव कसा वाचला?

नवनवीन गॅजेट्स आपल्या जगण्याचा हिस्सा झाले आहेत. आपले जगणे या गॅजेट्समुळे अतिशय सोपे झाले आहेत, ही गोष्ट कुणीच नाकारणार नाही. पण अनेकांचा या गॅजेट्सवर मुख्य आक्षेप हा असतो की हे गॅजेट्स लोकांना आळशी बनवत आहेत. तसेच यांच्यामुळे लोकांची आजारपणं वाढत आहेत. 

या प्रकारचे दावे काही अंशी खरे असले तरी काही गॅजेट्स खूप कामी येतात असं दिसून आलं आहे.  यात ऍपल वॉच बऱ्याच वेळा आघाडीवर दिसते. याआधी ऍपल वॉचमुळे कसा खुनाचा छ्डा लागला, तसेच कसे काही गुन्ह्यांचा तपास लावणे सोपे झाले, हे आपण बोभाटावर वाचले आहे.

नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यात ऍपल वॉचमुळे एका ६० वर्षीय वृध्दाचा जीव वाचला आहे. निवृत्त होऊन घरी आराम करत असलेल्या आर. राजवंश यांना त्यांच्या हावर्डमधील मुलाने हे घड्याळ भेट दिले होते.  सिद्धार्थ नाव असलेल्या त्यांच्या मुलाने हा घड्याळात ईसीजी चेक करता येत असल्याने हे घड्याळ बाबांना भेट दिले होते. 

एके दिवशी रात्री अचानक त्यांच्या हृदयाचे ठोके अनियमितपणे व्हायला लागले. राजवंश यांनी आपल्या ऍपल वॉचमध्ये ईसीजी चेक केला आणि त्यांनी त्वरित डॉक्टरांना दाखविण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी चेक केल्यावर त्यांना लगेच हृदय शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले.

अशाप्रकारे प्रसंगावधान राखून ऍपल वॉचमुळे राजवंश यांची वेळेवर शस्त्रक्रिया झाली आणि त्यांचा जीव वाचला. या गोष्टीची माहिती सिद्धार्थ यांनी थेट ऍपलचे सीईओ टीम कुक यांना इ मेलच्या माध्यमातून दिली. यावर कुक यांनी देखील उत्तर देत राजवंश यांची विचारपूस केली.

 

आणखी वाचा : 

किस्से डिजिटल उपकरणांमुळे लागलेल्या शोधाचे: अ‍ॅपलवॉचमुळे पडल्या सूनबाईंना बेड्या!!

किस्से डिजिटल उपकरणांमुळे लागलेल्या शोधाचे: 'ॲपल हेल्थ' ॲपच्या मदतीने खुनाचा छडा कसा लागला ??

सबस्क्राईब करा

* indicates required