computer

अवतार सिनेमाची प्रेरणा ठरलेली जगातली सर्वात उंच आउटडोर लिफ्ट...किती उंच आहे ही लिफ्ट?

जर तुम्हाला कुणी सांगितले की तुम्ही विमानाशिवाय ८८ सेकंदात १००० फूट उंचीवर जाऊ शकतात, तर तुम्हाला खोटं वाटेल. ही तर उडायची गोष्ट झाली असेच कुणाला पण वाटेल. साहजिकच ८८ सेकंदात तर दुसऱ्या कोणत्याही इतर मार्गाचा वापर केला तरी देखील १००० फूट उंच जाणे कठीण आहे.

पण चीनमधील हुनान प्रांतातील झांगझियाजी राष्ट्रीय उद्यानात मात्र अनेक लोक रोजच हा अनुभव घेत असतात. या राष्ट्रीय उद्यानात एक प्रचंड लांब लिफ्ट आहे. या लिफ्टच्या मदतीने लोकांना १००० फूट उंचीवर जाता येते. ही जगातील सर्वाधिक उंच आउटडोर लिफ्ट आहे.

या लिफ्टचे नाव, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंदवण्यात आले आहे.  ही लिफ्ट जमिनीपासून वर डोंगराच्या माथ्यापर्यंत जाते. तिची लांबी १०७० फुट एवढी आहे. असं म्हणतात की जेम्स कॅमेरूनला आपल्या जगप्रसिद्ध अवतार सिनेमासाठी या डोंगरावर असलेल्या घनदाट जंगलाकडूनच प्रेरणा मिळाली होती.

या लिफ्टचे नाव बायलॉंग लिफ्ट म्हणजेच 'हंड्रेड ड्रॅगन लिफ्ट' असे ठेवण्यात आले आहे. लिफ्ट बनविताना सुरक्षेची विशेष काळजी घेतली गेली आहे. या लिफ्टमध्ये तीन डबलडेकर इलेवेटर लावण्यात आले आहेत. लिफ्टची वाहनक्षमता ४९०० किलो आहे, म्हणजेच रोज १४ हजार लोकांची ने आण ही लिफ्ट करू शकते. कोरोना मुळे ही संख्या ८०००वर आली आहे. या लिफ्टचे  रिटर्न तिकीट १९ डॉलर एवढे आहे.

लिफ्टची रचना करताना निसर्गरम्य वातावरण डोळ्यांना दिसेल याची पूर्ण काळजी घेतली गेली आहे. अशा या नयनरम्य दृश्याला बघून जेम्स कॅमरुनला अवतारची कल्पना सुचणं साहजिकच होतं.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required