पेरूच्या सौंदर्यवतींच्या या फिगर्सनी सर्वांना विचारात पाडलंय...नक्की कसल्या फिगर्स आहेत या ?

Subscribe to Bobhata

दक्षिण अमेरिकेतील एका ‘ब्यूटी कॉन्टेस्ट’ मध्ये एक अजब प्रकार घडलाय. आता ब्यूटी कॉन्टेस्ट म्हटलं की तिथे सौंदर्यवतींना त्यांच्या फिगरबद्दल प्रश्न विचारला जातोच. इथेसुद्धा हा प्रश्न विचारला गेला, पण सौंदर्यवातींनी जी काही उत्तरे दिली ते बघून सगळेच आवाक झाले. याची चर्चा जगभर होऊ लागली आहे.

दक्षिण अमेरिकेतील ‘पेरू’ हा देश. तिथली २९ ऑक्टोबर २०१७ रोजी पार पडलेली ‘मिस पेरू २०१८’ ही ब्यूटी कॉन्टेस्ट. स्पर्धेतील मॉडेल्सना त्यांच्या फिगरबद्दल विचारले गेले आणि मग काय, कोणालाही अपेक्षित नसलेली उत्तरे मिळायला लागली. सर्व सौंदर्यवतींनी ‘पेरू’ मधील स्त्रियांवर होणाऱ्या अत्त्याचारांचा जणू पाढाच वाचला. 

लैंगिक अत्याचार, बलात्कार, महिलांच्या हत्या, इत्यादी गोष्टी त्यांनी समोर आणल्या. उदाहरणार्थ  एक मॉडेल पुढे येऊन म्हणाली, “माझं नाव कॅमिला कॅनोबाबा. माझी फिगर साईज आहे :  गेल्या ९ वर्षांमध्ये २,२०२ महिल्यांच्या हत्या झाल्याचं समोर आलं आहे.”

समंथा बॅटालानोस या मॉडेलने म्हटलं “माझी फिगर साईज आहे : लैंगिक अत्याचारामुळे प्रत्येक १० मिनिटाला एका मुलीचा बळी जातो.”

यावर १९८७ मध्ये ‘मिस पेरू’ चा किताब मिळवलेली ‘जेसिका न्यूटन’ या मॉडेलने म्हटलं की ‘दुर्दैवाने आजही अशा काही महिला आहेत ज्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल आपल्याकडे थोडीही माहित नाही. पेरू हा देश संपूर्ण दक्षिण अमेरिकेत महिलांसाठी सर्वात खतरनाक देश आहे.”

फक्त पेरूच नाही तर आपल्याला आणि संपूर्ण जगाला विचार करायला लावणारी उत्तरे आहेत ही.

सबस्क्राईब करा

* indicates required