मराठी पाऊल पडू दे पुढे...बोभाटाची पाच लेखांची नवी मालिका!!!

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने, "मराठी पाउल पडू दे पुढे!" ही विशेष लेख मलिका ५ भागात येत आहे.

उद्योगधंद्यात नेहेमी मागं राहिलेल्या मराठी माणसाच्या नव्या पिढीला उद्योग करण्यासाठी प्रोत्साहीत करावं हे या लेख मालिकेचं प्रयोजन आहे. हे सर्व व्यवसाय कमीत कमी पैशात करण्यासारखे आहेत. यासाठी साधारण बारावीपर्यंत शिक्षण झालं असेल तरी पुरेसं आहे. प्रत्येक लेखामध्ये एक व्यवसाय, त्याचं स्वरुप, त्याला लागणारं भांडवल, मनुष्यबळ, कच्चा माल आणि विक्री व्यवस्था याची पूर्ण माहिती असेल. 

जिथे शक्य आहे तिथं प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार्‍या व्यक्ति किंवा संस्था यांच्या प्रत्यक्ष संपर्काची माहिती या लेखांमध्ये असेल. या मालिकेचा पहिला लेख - "पडतर मालाचा व्यापार" आजच थोड्या वेळात प्रकाशित करत आहोत.

आता गरज आहे फ़क्त जिद्द आणि मेहेनतीची !!!

सबस्क्राईब करा

* indicates required