computer

या शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार परत का करायचा आहे ? त्याच्यावर ही वेळ का आली ??

मंडळी, पद्मश्री हा भारतातला चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पद्मश्री मिळणं मोठ्या सन्मानाचं समजलं जातं. पुरस्कारासोबत मान येत असला तरी काही विपरीत गोष्टी पण सोबत येतात. ओदिशाच्या एका पद्मश्री व्यक्तीसोबत असंच काहीसं घडलं आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्यावर पद्मश्री पुरस्कार परत करण्याची वेळ का आली आहे.

ओदिशाच्या दैतारी नायक यांनी कोणाच्याही मदतीशिवाय, एकट्याने गोन्सिका पर्वतातून ३ किलोमीटर लांब बोगदा खणला होता. यासाठी त्यांना ओडीसात “कॅनल मॅन” म्हणून ओळख मिळाली. लोकांनी कौतुक तर केलंच, पण सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला. यानंतरच त्यांच्या समस्यांना सुरुवात झाली.

मंडळी, दैतारी नायक हे अंगमेहनतीची कामं करतात. रोजच्या कामातून जो पैसा येतो त्यावरच त्यांचं घर चालतं. पुरस्कार मिळाल्यापासून त्यांना काम मिळायचं बंद झालं. त्यांना अशी कामं द्यायला लोकांनी नकार दिला आहे. त्यामागचा हेतू तसा वाईट नव्हता, कारण पद्मश्री मिळालेल्या व्यक्तीला अशी हलकी कामं द्यायला त्यांना अडचण वाटत होती.

परिणामी दैतारी नायक यांचा उपासमार सुरु झाली. त्यांच्यावर मुंग्यांची अंडी खाऊन दिवस काढण्याची वेळ आली आहे. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी आपला पुरस्कारच परत करायचं ठरवलं आहे.

मंडळी, त्यांची गोष्ट इथेच संपत नाही. पद्मश्री मिळाल्यानंतर त्यांना स्वतःचं घर मिळेल असं आश्वासन देण्यात आलं होतं. पण घर तर सोडाच,  पण त्यांच्या गावापर्यंत चांगला रस्ताही अजून तयार झालेला नाही.

मंडळी, एकीकडे सैफ अली खानसारख्या लोकांना काही विशेष न करता पद्मश्री पुरस्कार मिळतो आणि दुसरीकडे दैतारी नायक यांच्यासारख्यांना लोकोत्तर कामासाठी सन्मानित केलं जातं. पण  परिस्थितीमुळे त्यांच्यावर तो पुरस्कार परत करण्याची वेळ येते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required