'चल रंग दे' : झोपडपट्टीच्या गरीबीवर रंगीत मलमपट्टी ??

मुंबईत  उंच टॉवर आणि आलिशान इमारतींसोबतच  तसेच अनेक ठिकाणी झोपडयादेखील आहेतच. धारावी तर एकेकाळी आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जायची. आता नशीब ती तिसऱ्या क्रमांकावर गेलीय.

काय असतं या झोपडपट्टीत?  बाजूंनी चार पत्रे मारायचे  आणि एक छप्पर. झाली झोपडी तयार. त्यात मग अठरापगड माणसं आणि त्यांचं आयुष्य. या ओबडधोबड झोपडपट्ट्या जर सप्तरंगानी सजून निघाल्या तर त्या कशा दिसतील ? हे फोटो जरा बघाच मंडळी...

स्रोत

जर संपूर्ण मुंबईच्या झोपडपट्ट्या अशा रंगीबेरंगी झाल्या, तर ह्याच झोपड्या पर्यटकांसाठी नवा पर्याय ठरतील. मंडळी, हे आता शक्य होणार आहे “चल रंग दे” या मोहिमेमुळे. ‘FruitBowl Digital’ या कंपनीनं ‘मुंबई मेट्रो वन’, ‘Snowcem Paints’ and ‘Co.Lab.Oratory Asia’ बरोबर मिळून हा उपक्रम सुरु केला आहे.

घाटकोपरमधल्या ‘असल्फा’ पासून याची सुरुवात झालीय. ४०० लोकांच्या ३ दिवसांच्या मेहनतीचं फळ म्हणजे या चित्रांत दिसत असलेलं रंगीबेरंगी काम. काही दिवसांतच हा उपक्रम संपूर्ण मुंबईत राबवला जाणार आहे. या मोहिमेमुळे प्रत्येक घराला एक वेगळा आणि डार्क रंग देण्यात येईल आणि त्यामुळं लांबून बघताना आपल्याला संपूर्ण झोपड्या सतरंगी रंगात बुडालेल्या दिसतील. आहे की नाही भन्नाट आयडिया ?

स्रोत

या सर्व उपक्रमामागील हेतू एकच आहे की झोपडपट्टीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलणे. घाण, नाले, गचाळ, गलिच्छ वातावरण अशी जी ओळख झोपडपट्ट्यांना मिळाली होती, ती कुठेतरी यामुळे पुसली जाईल.

‘चल रंग दे’ मोहिमेत सिंहाचा वाटा असलेले ‘दैदीप्य रेड्डी’ म्हणतात की “Color the community, color the hill, color the humanity” हे आमचं ब्रीदवाक्य आहे. रेड्डींनी news 18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की ‘आम्ही जेव्हा लोकांना त्याचं घर रंगवण्याबाबत विचारलं तेव्हा त्यांनी एकच प्रश्न विचारला “आमच्या घरांना तुम्ही का रंगवणार ?”

स्रोत

अर्थात हे काम सोपं नव्हतं. अनेक प्रयत्नानंतर त्यांना १२० भिंतींना रंगवण्याची परवानगी मिळाली. लोकांच्या संमिश्र प्रतिसादात हे काम पूर्ण झालं. पण आता पुढील लक्ष असेल संपूर्ण मुंबई पेंट करणं.
हे महत्वाचं पाऊल उचलल्या बद्दल “चल रंग दे” टीमचं खरंच कौतुक आहे.

शेवटी एक प्रश्न पडतोच : ह्या झोपडपट्टी बघून बघणाऱ्याला तर आनंद होईल पण त्यात राहणाऱ्यांच्या व्यथा, दुःख कमी होतील का ?

 

आणखी वाचा : 

एका झोपडपट्टीचा कायापालट...वाचा कुठे आहे हे ठिकाण !!!

सबस्क्राईब करा

* indicates required