लैंगिक अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या ५ रणरागिणी...पण हा सहावा हात कोणाचा आहे ?

#MeToo मोहिमेच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या लैंगिक शोषणाबद्दल उघडपणे मतं मांडली. या मोहिमेला सुरुवात करणाऱ्या महिलांचा टाईम्स मॅग्झीनने  'पर्सन ऑफ द इअर' पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. जगभरात या मोहिमेने अनेकांना बोलतं केलं. लोकांनी त्यांच्यावर भूतकाळात झालेले अत्याचार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या  शेअर केले. ही एक क्रांतिकारी मोहीम होती.

या पाच महिलांमध्ये पॉप सिंगर ‘टेलर स्विफ्ट’, उबरची माजी इंजिनिअर   सुझन फॉऊलर, लॉबीस्ट आदामा इवू आणि इझाबेल पास्क्युअल या महिलांचा समावेश आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर या सर्व महिलांचा फोटो टाईम्स मॅग्झीनच्या कव्हर पेजवर छापला गेला आणि जगभर याची चर्चा सुरु झाली. या महिलांनी केलेल्या कामगिरीबद्दल आणि पुरस्काराबद्दल ही चर्चा तर होतीच, पण त्याचबरोबर या फोटोत एक विचित्र गोष्ट दिसत आहे त्याबद्दलही लोक बोलू लागले.

स्रोत

मंडळी नीट बघितलं तर तुमच्याही लक्षात येईल की फोटोत ५ महिला असताना आणखी एक व्यक्ती तिथे दिसत आहे. या सहाव्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही, पण  फक्त हात दिसतोय. हा हात कोणाचा आहे? हे नेमकं काय प्रकरण आहे? चला जाणून घेऊ.

टाईम्सचे मुख्य संपादक Edward Felsenthal यांनी सांगितल्याप्रमाणे हा चेहरा नसलेला हात हा टेक्ससमधल्या एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिलेचा आहे. तिच्या खाजगी आयुष्यावर परिणाम होऊ नये म्हणून तिने आपला चेहरा लपवलाय. खरं तर हा अर्धवट हात आजही आपल्यावरील अत्याचारांबद्दल बोलू शकत नसणाऱ्या त्या तमाम लोकांचं प्रतिक आहे. मंडळी, टाईम्सचा हा फोटो साधा असला तरी खूप काही बोलून जातो. लैंगिक अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी हे एक महत्वाचं पाऊल आहे!!

सबस्क्राईब करा

* indicates required