'चना दाल' दाखल झाली ऑक्सफर्ड डिक्शनरीत...!!!

ब्वा ज्या ऑक्सफर्ड डिक्शनरी चाळून आपण सगळे इंग्लिशचा अर्थ लावत होतो, त्याच डिक्शनरीत आपले आणखी  दोन भारतीय शब्द सामील झाले आहेत. ही अगदी ताजी फ्रेश बातमी आहे मंडळी. लोकहो, हे शब्द आहेत ‘चना’ व ‘चना दाल’.

हिंदीतले हे शब्द ६०० इतर शब्दांबरोबर ऑक्सफर्ड डिक्शनरीत दाखल झाले आहेत. दर तीन महिन्यांनी नवे शब्द या डिक्शनरीत ‘अपडेट’ केले जातात. यात सामाजीक क्षेत्रातील शब्दांपासून ते शैक्षणिक, चालू घडामोडी, जीवनपद्धतीवर आधारित शब्दांचा समावेश असतो. 


यावेळचे हे दोन्ही शब्द रोजच्या जीवनातील असल्यानं त्यांना डिक्शनरीत स्थान मिळाल्याचं बोललं जात आहे. इंग्रजीत चण्याला Chickpeas  म्हणतात तर चणा डाळीला chickpea lentils म्हणतात ! यापूर्वी सरदार, धोती, पग, चपाती, चटणी अशा अनेक शब्दांना ऑक्सफर्ड डिक्शनरीनं आपलं म्हटलं आहे.. 


तर आहे की नाही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट !!

सबस्क्राईब करा

* indicates required