व्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा!!

टार्गेट्स पूर्ण नाही झाले तर तुम्हाला बॉसचं लेक्चर ऐकावं लागतं का ? मग तर तुम्ही फारच लकी आहात. तुम्हाला फक्त बोलणी खावी लागतात राव. तुम्ही जर चीनच्या या कंपनीत असता तर तुम्हाला हे भोगावं लागलं असतं. पाहा हा व्हिडीओ.

मंडळी, जमिनीवर सरपटणारी ही माणसं चीनच्या एका बड्या कंपनीत काम करणारे कर्मचारी आहेत. त्यांच्यावर ही वेळ येण्याचं कारण म्हणजे त्यांनी कंपनीचे टार्गेट्स पूर्ण नाही केले. यासाठी शिक्षा म्हणून त्यांची अशा प्रकारे धिंड काढण्यात आली. रांगेच्या पुढे झेंडा घेतलेली व्यक्ती ही कंपनीचीच प्रतिनिधी आहे. त्या व्यक्तीच्या हातात दिसणारा झेंडा हा कंपनीचा झेंडा आहे.

मंडळी, हा सगळा प्रकार भर रस्त्यात घडत होता. थोड्याच वेळात तिथे पोलीस आले. पोलिसांनी हे वेळीच थांबवलं. पण तोपर्यंत सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. हा प्रकार एवढा व्हायरल झाला की कंपनी तात्पुरती बंद करण्यात आली आहे.  

चीन मध्ये हे काही पहिल्यांदा घडत नाहीय. गेल्या वर्षी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. टार्गेट पूर्ण न केल्याने कंपनीने कर्मचाऱ्यांना कानाखाली मारलं होतं.

सबस्क्राईब करा

* indicates required