computer

स्पेलिंग मिस्टेक लपवण्यासाठी कंपनीने लकी ड्रॉ काढला, १ कोटी बीअर कॅन्स विकून कंपनीच लकी ठरली!!

'आपदा मे अवसर' हे वाक्य अनेकवेळा म्हटले जाते. याचा साधा सरळ अर्थ म्हणजे काही चूक झाल्यास त्याचा वापर चांगल्यासाठीच करून घेणे. जुगाडाचाच हा वेगळा पॅटर्न म्हणता येईल. आपण टाकाऊतून टिकाऊ करतो ना, काहीसं तसंच. या सर्वांवर कडी करत परू(Peru) देशातील एका बियर कंपनीने ज्या एका चुकीमुळे त्यांची बाजारात प्रचंड नाचक्की झाली असती, त्यातून त्यांनी चक्क कोट्यवधींचा व्यवसाय केला आहे.

हेनीकेन बीअर कंपनी तर माहितच असेल. ही कंपनी ट्रेस कृसेज या ब्रँडची बियर तयार करत होती. हा ब्रँड ते बाजारात आणत होते. ३ लाख बियर कॅन त्यांनी बनवून रिटेल दुकानदारांना पाठवून दिले. एवढे सगळे झाले आणि त्यांना एक मोठी चूक आपण केली हे समजले. या सर्व बियर कॅन्सवर स्पेलिंग मिस्टेक होती.

कंपनीचे घोषवाक्य आहे, disfrut! या स्पॅनिश शब्दाचा अर्थ होतो, आनंद किंवा मस्ती. आता या शब्दातील s मात्र छपाईवेळी राहिला आणि कंपनीची मोठी गोची झाली. हे बियर कॅन तसेच विकायचे तर बाजारात ट्रोलिंग होऊन नाचक्की पत्करावी लागली असती. सर्व कॅन परत मागवायचे तर मोठे नुकसान सहन करावे लागले असते.

आता कंपनीने डोक्यालिटी लढवली आणि ही डोक्यालिटी चांगलीच यशस्वी झाली. त्यांनी थेट लकी ड्रॉ सारखी ऑफर सुरू केली. त्यांनी जाहीर केले, कंपनीने जाणीवपूर्वक काही कॅनवर स्पेलिंग मिस्टेक केली आहे. असे कॅन ज्यांना मिळतील किंवा जे शोधून काढतील त्यांना इनाम दिला जाईल.

यासाठी त्यांनी पूर्ण तयार केली. महिनाभरच ही ऑफर सुरू असेल असेही जाहीर केले, जेणेकरून लोकांनी लवकरात लवकर हा माल संपवावा. कॅनचा फोटोकाढून वेबसाईटवर अपलोड करावा आणि कॅनवर असणारा कोड टाकावा, असे नियम ठरवून दिले.

महिना पूर्ण झाला आणि कंपनीचा प्लॅन अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरला. ३ लाख कॅन संपविण्यासाठी त्यांनी आयडिया केली पण तब्बल एक कोटी कॅन्स फक्त महिन्याभरात विकले गेले. जेवढी कमाई त्यांनी वर्षभरात होईल असे गृहीत धरले होते, ती कमाई महिन्यात झाली.

ठरल्याप्रमाणे कंपनीकडून s पासून सुरू होणारे गिफ्ट लोकांना दिले. यात स्पीकर, स्मार्टवॉच, स्कूटर्स अशा वस्तूंचा समावेश होता. यातून आयडिया केली आणि कामी आली अशी नवी म्हण तयार करता येऊ शकते. चूक प्रत्येकाकडून होते. फक्त डोकं लावून त्यातून फायदा करून घेता आला पाहिजे, हे मात्र खरं आहे हे या कंपनीने सिद्ध केले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required