मध्यप्रदेशात राहणाऱ्या या जैन दाम्पत्याने आपली तब्बल १०० कोटींची संपत्ती सोडून घेतलाय संन्यास

आपल्याला अनेकदा वाटत की सगळं सोडून हिमालयात जावं, सगळं मोह माया आहे, आता या जगात काहीच उरलं नाही.  ब्रेकअप झाल्यावर हे जास्तच तीव्रतेनं जाणावतं.  मंडळी, गंमत म्हणून ठीक आहे, पण आपल्या मनात संन्यास घेण्याचे कितीही विचार आले तरी आपण काही खरंच सन्यास घेणार नाही हे आपल्यालाही ठाऊक असतं.  पण काही लोक खरे खुरे संन्यासी होतात.. अगदी आपली करोडोची मालमत्ता सोडून!!

आता हेच बघा ना, मध्यप्रदेशात राहणाऱ्या एका जैन दाम्पत्याने आपली तब्बल १०० कोटींची संपत्ती सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय.  २३ सप्टेंबर २०१७ ला ते जैन आचार्य रामलाल महाराज यांच्याकडून दीक्षासुद्धा  घेणार आहेत. सुमित राठोड आणि अनामिका राठोड असं या दोघांचं नांव आहे. ३५ वर्षीय सुमित हा लंडनवरून शिक्षण घेतलेला धनाढ्य व्यक्ती आहे, तर त्याची पत्नी अनामिका ही इंजिनियर आहे. अनामिका एका  एका मल्टीनॅशनल  कंपनीमध्ये नोकरी करते. या दोघांना ३ वर्षांची एक मुलगी देखील आहे. 

दोघांचा संन्यास घेण्याचा निर्णय हा त्यांचा स्वतःचा असला तरी इथे एक प्रश्न पडतोच की या चिमुकल्या मुलीचं संगोपन कसं होणार? सध्या अनामिका चे वडील  'अशोक चांदलीया' यांनी मुलीची जबाबदारी घेतल्याचं समजतं. त्यांच्या या दोघांच्या निर्णयाला पाठिंबा आहे. दोघांच्याही घरच्यांना या निर्णयाने तितकासा धक्का बसला नाहीय.  दोघांनी याआधी देखिल आपला हा निर्णय बोलून दाखवला होता. आश्चर्य म्हणजे तेव्हा त्यांची मुलगी ८ महिन्यांची होती. 

मंडळी, शेवटी एका प्रश्नाचं उत्तर समाधानकारक मिळालेलं नाही की या मुलीचं पुढे काय? काही मुलांना आई वडील नसतात म्हणून ते अनाथ होतात, पण इथे तर आई वडील असूनही अनाथ होण्याची वेळ या चिमुकलीवर आली आहे.

यावर तुम्हाला काय वाटत ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा!

सबस्क्राईब करा

* indicates required