करणार का अर्ज डी-मार्टच्या शेअर्ससाठी ?

येत्या ८ मार्चला डी मार्टच्या शेअरचा आयपीओ बाजारात विक्रीसाठी येणार आहे. 'डी मार्ट' हा अ‍ॅव्हेन्यू सुपर मार्केट या कंपनीचा ब्रँड आहे. 

शेअरच्या विक्रीतून कंपनी १८७० कोटी रुपयाचे भाग भांडवल उभे करणार आहे. 

या विक्रीत अर्ज करावा का? या प्रश्नाचे उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

१ इतर सुपर मार्केट किंवा मॉलपेक्षा डी-मार्टचा फंडा वेगळा आहे.. डिस्काउंट देऊन ग्राहकांची झुंबडगर्दी जमवण्यापेक्षा, "कायम कमी भावात नियमित विक्री " करून वारंवार येणार्‍या ग्राहकांची संख्या वाढवत नेणे हा त्यांचा फंडा आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या भागातील सर्व दुकाने नफ्यात चालतात.

२ डी-मार्टची  सर्व दुकाने कंपनीची स्वतःची आहेत. भाडे करारावर नाहीत. या दुकानांची रीअल इस्टेट वॅल्यू वाढत जाणार आहे.

३ कंपनीचा भर आटोपशीर कारभारावर आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण राहते.

४ नफ्याच्या तुलनेत डी-मार्ट अग्रेसर आहे.. काही तुलनात्मक आकडे बघा.

*गेल्या वर्षी डीमार्टने ८६०० कोटीच्या उलाढालीवर ३०० कोटीचा नफा केला. 

*रीलायन्स रीटेल या कंपनीला इतकाच नफा कमवायला १८००० कोटीची उलाढाल करावी लागली. 

*बिग बझारने हा नफा अजून बघीतलेलाच नाही (फक्त १४ कोटी नफा) 

*स्पेन्सर रीटेल ही कंपनी अजून तोट्यातच आहे.

* कंपनीचे प्रमोटर राधाकिशन दमाणी यांचा बाजारातील दबदबा फार मोठा आहे. राधाकिशन दमाणी हे शेअर बाजारातील मोठे प्रस्थ आहे. त्यांच्या करीअरची सुरुवात त्यांनी बॉलपेन विकण्यापासून केली. हर्षद मेहताला टक्कर देणारा एकमेव ब्रोकर अशी त्यांची शेअर बाजारात ख्याती आहे. मार्केट किंग राकेश झुनझुनवाला यांचे ते गुरु समजले जातात. 

* शेअरच्या लिस्टींगनंतर  गुंतवणूकदाराला भरघोस नफा मिळण्याची शक्यता आहे. (ग्रे मार्केटमध्ये १५० रुपयाचा प्रिमियम दिला जातो आहे)

( बोभाटा या संस्थळाद्वारे हा आढावा घेतला आहे. बोभाटाचा सदर कंपनीशी काही आर्थिक किंवा इतर काही व्यवहार नाही )

सबस्क्राईब करा

* indicates required