computer

मुंबईजवळच्या या रेस्टोरंटना तुम्ही नक्की भेट द्यायलाच हवी!!!

एखाद्या दिवशी मस्त बाहेर जाऊन जेवण करण्याचा बेत करत असाल तर मुंबईपासून जवळ, नव्याने उघडलेल्या रेस्टॉरंटमध्ये जायला तुम्हाला आवडेल का? सध्या लॉकडाऊननंतर जनजीवन हळूहळू सुरळीत होत आहे. अनेकजण काळजी घेत प्रवासाला निघत आहेत. रेस्टॉरंट्सही सर्व नियम पाळून ग्राहकांना सुखद अनुभव देण्यासाठी सज्ज होत आहेत. मुंबईकरांनो वीकेंड गेटवेसाठी निसर्गाच्या सानिध्यात मस्त रेस्टॉरंट शोधत असतील तर त्यांच्यासाठी काही नवीन रेस्टॉरंट्सची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेली ही रेस्टॉरंटस लोणावळा, अलिबाग आणि कर्जत इथली आहेत. एक दिवसाची ट्रिप तुम्ही सहज प्लॅन करू शकता.

अँग्लो-इंडियन कॅफे आणि बिस्ट्रो, लोणावळा

लोणावळ्यात सध्या पावासामुळे फार सुंदर वातावरण आहे. त्याच वातावरणात डोंगरांमध्ये वसलेले आहे, अँग्लो-इंडियन कॅफे! मुंबईच्या लोकप्रिय इटरी 'आउट ऑफ द ब्लूच्या' टीमने हे रेस्टॉरंट उघडले आहे. इथे तुम्ही आत जाता तेव्हा एखाद्या युरोपियन रेस्टॉरंटमध्ये जात आहात असे वाटेल. इथे आतल्या भागात शिरल्यावर हळुवार संगीत वाजत असते. मागच्या बाजूला तुम्हाला हिरवेगार डोंगर दिसतील. या रेस्टॉरंटचे इंटेरियर पहिल्यावर जणू परदेशात आहे असा अनुभव येतो. पांढरेशुभ्र खांब, टेबल, खुर्च्या एकदम फ्रेश वातावरण. या रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये युरोपियन आणि भारतीय पदार्थ आहेत. मेनूमधील स्वादिष्ट पदार्थांमध्ये चिकन चेरमौला(Chicken Chermoula), काजू क्रिस्पी फुलकोबी, मस्टर्ड BBQ फिश, स्मोक्ड पनीर टिक्का,पिझ्झा, चिक्की चीज़केक आणि ऑर्गेनिक गोई चॉकलेट केटो टार्ट याची चव तुम्ही चाखू शकता. राहायचे असल्यास इथे 3 बेडरूमचा व्हिलादेखील आहे.

सॉल्ट, कर्जत

मुंबईजवळ सॉल्ट हे एक आलिशान रेस्टॉरंट आणि बार आहे . हे कर्जतमध्ये १७० एकर ओलियंडर फार्ममध्ये आहे. युरोपियन, भारतीय आणि आशियाई अशा तीनही प्रकारच्या चवदार पाककृती तुम्हाला चाखता येतील.
रेस्टॉरंटशिवाय इथे एक मिनी थिएटर, एक नर्सरी आणि एक मद्यनिर्मिती केंद्र देखील आहे. तिथे तुम्हाला भेट देता येईल. इथले निसर्गरम्य वातावरण आणि खाद्यपदार्थांची रेलचेल मन प्रसन्न करते. इथले इंटेरियर आधुनिक आणि पारंपरिक असा सुरेख मेळ आहे. मेन्यूमधील सर्वात लोकप्रिय डिश म्हणजे मलाई ब्रोकोली, केसरी दही के कबाब, मॅक आणि चीज अरॅन्सिनी, वाइन ब्रेइज्ड रेड रिसोट्टो, पिझ्झा, ट्रेस लेचेस आणि सॉल्टेड कारमेल मूस आहेत. याशिवाय इथली कॉकटेल ही विशेष चवदार आहे. हे रेस्टॉरंट फार्म हाऊसवर आहे. इथे ससे आहेत, तसेच मालकाचे विंटेज कार collection आवर्जून पाहण्यासारखे आहे.

टेन 94, अलिबाग

हा कॅफे नुकताच उघडले आहे. पाच मित्रांनी मिळून ते उघडले आहे. हे रेस्टॉरंट्स लक्झरी होमवेअर आणि लाइफस्टाइल स्टोअरचा एक भाग आहे. हे एक मोठ्या मोकळ्या भागात आहेत. बरेच लाईटस लावून हा भाग सजवला आहे. इथे मेन्यूमध्ये नवनवीन पदार्थ नेहमी ऍड केले जातात. या कॅफेत खाण्यासोबत अनेक उपक्रमही होत असतात. अनेक कूकिंग शो, पॉटरी शो घेतले जातात. इथे मिळणारी कॉफी ही आख्ख्या अलिबागमधली उत्कृष्ट कॉफी आहे असे इथे कॉफी पिणारे मानतात. इथले बेकरी प्रोडक्टसही उत्कृष्ट मिळतात. हे कॅफे म्हणजे एक happening place आहे.

व्हिला बिस्ट्रो, डेला ॲडव्हेंचर अँड रिसॉर्ट्स, लोणावळा

तुम्ही इटालियन पदार्थांचे चाहते असाल तर व्हिला बिस्ट्रो मध्ये जरूर भेट द्या.
आर्किटेक्ट आणि डिझायनर जिमी मिस्त्री यांनी डिझाइन केलेले हे आलिशान व्हिला बिस्ट्रो १८० सीटर डायनिंग रेस्टॉरंट ४००० चौरस फूटांवर पसरलेले आहे. मिस्त्री यांनी इंटेरियर ही फार कल्पकतेने सजवले आहे. या नवीन रेस्टॉरंटमध्ये क्लासिक इटालियन पदार्थांचा मेनू आहे. अँटीपास्टी, वूड फायर पिझ्झा, हाताने रोल केलेले पास्ता, सिजनल सॅलड आणि पारंपारिक इटालियन डेझर्ट. इथे सर्व इटालियन पदार्थ मिळतात. पारंपरिक ते आधुनिक अश्या वेगवेगळ्या स्वादिष्ट इटालियन पदार्थांचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. एका वेगळ्या वातावरणात इटालियन पदार्थ खाणे तुम्हाला नक्कीच आवडू शकते.

जत्रा, अलिबाग

जर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात साधे महाराष्ट्रीयन जेवण किंवा नाश्ता शोधत असाल तर जत्रा पहा! अलिबागच्या मायलेकीनी म्हणजे नयना राहुल गोरेगावकर आणि धनी गोरेगावकर यांनी जत्रा नावाचे रेस्टॉरंट सुरू केले आहे. एकदम ताजेतवाने आणि चवदार पदार्थ इथे मिळतात. विशेष म्हणजे तिथेच शेतात उगवलेल्या भाजीपाल्याचा वापर इथल्या स्वयंपाकात होतो आणि तोही माफक दरात. ढाबा पद्धतीचे रेस्टॉरंट तुम्हाला आवडत असेल तर हे नक्की आवडेल. ढाबा-शैलीतील पिवळ्या भिंतींवर लटकलेल्या जुन्या मराठी चित्रपटाचे पोस्टर्स इथे पहायला मिळतात. स्थानिक आणि पर्यटकांना जत्रेचा मिसळ पाव, वडा पाव, पोहे, भजी, अंडी केजरीवाल, पुरी भाजी, शिरा आणि उपमा आवडतात.इथे पदार्थांची चवही रुचकर असते.

ही माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर, टॅग करायला विसरू नका.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required