ड्रोन कॅमेर्याने घेऊयात आठ मिनिटात अष्टविनायक दर्शन..

या गणपती उत्सवात नव्या-नव्या तंत्रज्ञानाने घरबसल्या दर्शन घेण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. व्हर्च्युअल रिऍलिटी आणि ३६० डिग्री फोटोनंतर आता ड्रोन कॅमेर्याने चित्रित केलेले अष्टविनायकाचे दर्शन आता शक्य झाले आहे. झोन मीडिया या कंपनीने आपल्या युट्युब चॅनलवर हे व्हिडीओ उपलब्ध केले आहेत. चला तर मग दर्शन घेऊयात..