computer

दारूची झिंग उतरवण्यासाठी त्याने चालायला सुरुवात केली आणि ८०० किलोमीटर लांब पोचला !!

नशा करणाऱ्यां किती चित्रविचित्र गोष्टी करतात हे सांगण्याची गरज नाही. अधूनमधून त्यांचे व्हिडिओ वायरल होत असतात. पण एका गड्यासोबत जास्तच विचित्र गोष्ट घडली आहे राव!!

स्कॉटलँडमधला बार्नी रुल नावाचा २० वर्षाचा तरुण एडिनबर्ग युनिव्हर्सिटीत शिकतो. भावाने युनिव्हर्सिटी सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याच खुशीत मित्रांसोबत पार्टी करायला गेला. जवळच असलेल्या एका क्लबमध्ये तो आणि त्याचे मित्र पार्टी करत होते. त्याला जशी चढायला लागली तसा तो क्लबमधून निघून गेला. 

बार्नी विचार केला की शांतपणे चालत जाऊ म्हणजे आपले मन शांत होईल. या विचारात त्याने चालायला सुरुवात केली, पण नंतर त्याच्यासोबत विचित्र आणि अश्वसनीय गोष्ट घडली.  

बार्नी रात्रभर चालत राहिला. त्याला  समजले की तो थांबू शकत नाहीये. तो स्वतःचे चालणे कंट्रोल करू शकत नव्हता. तो एकसारखा चालत होता. ही गोष्ट घडली ७ सप्टेंबरच्या रात्री. गडी तेव्हापासून तर आजपर्यंत चालतच आहे. तो जवळपास ८०० किलोमीटर अंतर एवढ्या दिवसात चालून गेला आहे. चालता चालता तो स्कॉटलँडहून स्पेनपर्यंत पोचण्याच्या विचारात आहे.

सध्या तो फ्रान्समध्ये आहे. दिवसाला तो तब्बल ३२ किलोमीटर चालत आहे. भावाने फ्रांसमधून चालताना फ्रेंचसुद्धा शिकून घेतली.

आहे ना गंमत? आपल्याला सगळं कळलं असं वैद्यकशास्त्र म्हटलं तर माणसाला उत्तर सापडलं नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत.

 

लेखक : वैभव पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required