computer

युनायटेड किंग्डम, ब्रिटन, ग्रेट ब्रिटन आणि इंग्लंड यांत नेमका फरक आणि साम्यं काय आहेत असा प्रश्न कधी पडलाय? हे घ्या उत्तर!!

युनायटेड किंग्डम, ब्रिटन, ग्रेट ब्रिटन आणि इंग्लंड ही नावे तुम्ही बऱ्याचदा ऐकली असतील. युके म्हणजेच, ब्रिटन आणि ब्रिटन म्हणजेच इंग्लंड, तुम्हालाही असेच वाटत असेल तर हा संपूर्ण लेख नक्की वाचा.

पहिल्यांदा आपण युनायटेड किंग्डम म्हणजे काय ते पाहू.

युनायटेड किंग्डमचे पूर्ण नाव ‘युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दर्न आयर्लंड’ असे आहे. इंग्लंड, स्कॉटलंड, उत्तर आयर्लंड आणि वेल्स या चार स्वतंत्र देशांचा मिळून बनणारा प्रदेश तो युके, म्हणजेच युनायटेड किंग्डम!! युके मध्ये संसद ही सर्वोच्च स्थानी आहे आणि या चारही देशांना अंतर्गत कारभारात स्वायत्तता देण्यात आली आहे. या चार देशाच्या एकत्रित समूहाला युके म्हटले जाते. युके हे नाव त्या भूभागाचे नाव आहे ज्यावर हे चारही देश वसलेले आहेत. हे चारही देश ब्रिटनच्या राजघराण्याशी बांधील आहेत, पण एक देश म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख देखील आहे. संपूर्ण युकेसाठी इंग्लिश हीच राजभाषा असली तरी प्रत्येक देशात त्यांच्या त्यांच्या बोलीभाषेतच कामकाज चालते.

आता पाहूया ग्रेट ब्रिटन म्हणजे काय?

ग्रेट ब्रिटन हा यु.के.चाच एक भाग आहे. यामध्ये इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स हे देश येतात. तिन्ही देशांची परदेश नीती आणि संरक्षण या सारखे महत्वाच्या मुद्द्यांबाबतचे निर्णय ग्रेट ब्रिटन घेते. बाकी, शिक्षण, रोजगार यासारखे अंतर्गत प्रश्न स्थानिक सरकारच्या अखत्यारीत येतात.

ब्रिटन

पूर्वीच्या म्हणजे रोमन कालीन ब्रिटानिया पासून ब्रिटन हा शब्द अस्तित्वात आला आहे. इंग्लंड आणि वेल्स या दोन देशांचा मिळून ब्रिटन होतो.

इंग्लंड

इंग्लंड हा यु.के. ग्रेट ब्रिटन आणि ब्रिटनचा एक भाग आहे. हा स्वतंत्र देश आहे आणि त्याची राजधानी लंडन आहे. स्कॉटलंड आणि वेल्सप्रमाणेच हाही एक स्वायत्तता असलेला देश आहे. या देशाची स्वतःची क्रिकेट टीम आणि फुटबॉल टीमदेखील आहे. या टीममध्ये इतर देशांचे खेळाडू सहभागी होऊ शकत नाहीत.

त्यानंतर आणखी एक भाग येतो तो म्हणजे कॉमनवेल्थ रील्म. ब्रिटिश राजघराण्याची सत्ता ज्यांच्यासाठी सर्वोच्च स्थानी आहे असे देश या संघटनेत येतात. तसे तर हे देश आपले स्वतंत्र सरकार चालवतात. पण युनायटेड नेशन्सपासून स्वतःला तोडत नाहीत. युनायटेड नेशन्सशी असलेला आपला संबंध ते मान्य करतात.

यामध्ये एंटीगिडा, बार्ब्युडा, ऑस्ट्रेलिया, द बहामास, बार्बाडोस, बेलीझ, कॅनडा, ग्रेनेडा, जमैका, न्युझिलंड, पापुआ न्यू गिनी, सेंट किट्स अँड नेविस, सेंट लुसिया, सेंट विन्सेंट अँड द ग्रेनाडाइन्स, सोलोमन, आयलँड, तुवालू, असे छोटे छोटे देश येतात.

तर युनायटेड किंग्डम, ब्रिटन, ग्रेट ब्रिटन आणि इंग्लंड यातील फरक तुमच्या लक्षात आला असेल. भारत आणि हिंदुस्थान याप्रमाणे हे एकाच देशाची अनेक नावे नसून प्रत्येक समूहाचे स्वतंत्र नाव आहे आणि त्याला भिन्न अर्थ आहे तसंच काहीसं इथंही आहे.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required