'उबर' ड्रायव्हरची कमाल...कार चक्क अरबी समुद्रात कशी पोहोचली भाऊ ??
उबर किंवा ओला टॅक्सी बुक करताना लोकेशन प्रॉब्लेम हमखास येतो. अॅपमध्ये ड्रायव्हरचं लोकेशन आपल्यापासून अगदी जवळ असल्याचं दिसतं, पण तो आपल्यापर्यंत पोहोचायला किमान अर्धा तास तरी जातोच. काहीवेळा टॅक्सी ड्रायव्हर आपलं लोकेशन चुकीचं दाखवतात आणि आपण जेव्हा कंटाळून बुकिंग कॅन्सल करतो तेव्हा आपल्यालाच खिश्यातून चार्जेस भरावे लागतात. असं तुमच्यासोबतही झालं असेल...नाही का ?
पण मंडळी, आज जी बातमी आली आहे ती म्हणजे याच्याही पुढची आहे. झालं असं की, हुसैन शेख या फेसबुक युझरने उबर टॅक्सी बुक केली होती. आता नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्या टॅक्सी ड्रायव्हरने चुकीचं लोकेशन दाखवलं. पण यावेळी कहर म्हणजे हे लोकेशन अरबी समुद्रात निघालं. या युझरने स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे, ज्यात ही टॅक्सी चक्क अरबी समुद्रात दिसत आहे. चुकीचं लोकेशन दाखवण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हर हे विसरला की समुद्रात कार चालवता येत नाही.
हुसैन शेखने शेअर करताना म्हटलंय की ‘अस्लम भाई सबमरीन से आरेले है’. कदाचित हा टॅक्सी ड्रायव्हर खरोखर अरबी समुद्रातून पाणबुडीसारखा येत असेल किंवा याच्याकडे उडणारी कारसुद्धा असू शकते.
मंडळी तुमच्यासोबत असं कधी घडलंय का? तुमचे अनुभव शेअर करा!!




