चला मंडळी पुरुषवाडीच्या काजवा महोत्सवाला...!!

Subscribe to Bobhata

आठवड्याचे सातही दिवस काम करून ‘बोर’ झालात? रुटीन जॉबने हैराण झालात ? ब्रेक पाहिज? मग चला स्वित्झर्लंडला!!!

आता तुम्ही म्हणाल एवढे पैसे असते, तर केव्हाच गेलो असतो ना राव! पण मंडळी स्वित्झर्लंडऐवजी आम्ही तुम्हाला अशी एक जागा दाखवणार आहोत, जिथं गेल्यावर तुमचा थकवा पार पळून जाईल आणि नव्याने काम करण्याचा हुरूप येईल. राव, ही जागा तुमच्या खिशाला परवडेल अशीच आहे. टेन्शन घेऊ नका!! चला तर जाणून घेऊया या ठिकाणाविषयी...

पुरुषवाडी, अकोले, अहमदनगर !

स्रोत

रोजच्या कटकटीतून मुक्तता आणि निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी मान्सून मधलं उत्तम ठिकाण म्हणजे पुरुषवाडी. हे गाव ओळखलं जातं ते तिथल्या काजव्यांमुळं. मंडळी< इथे दरवर्षी २१ मे ते ३ जुलै ‘काजवा महोत्सव’ भरतो. असंख्य काजव्यांनी भरलेली ही रात्र म्हणजे एखाद्या परीकथेला शोभेल अशीच असते.

firefly3-1-jpgfirefly3-1574d500789eb4-originalस्रोत

मान्सून हा काजव्यांसाठी समागमाचा कालावधी असतो. त्यामुळं लाखो काजवे पुरुषवाडी आणि आसपासच्या भागात जमा होतात आणि ती संपूर्ण रात्र झगमगून उठते. ‘ग्रासरूट’ या संस्थेनं या गावाला दत्तक घेतलंय आणि  इथल्या सर्व पर्यटनाची व्यवस्था ही संस्था करते. हिंदू महादेव कोळींचं हे गाव जणू आता पर्यटनासाठी ‘कॅम्पसाइट’ झालं आहे. पर्यटकांची राहण्याची सोय गावकर्‍यांच्या घरातच  केली जाते. त्यामुळं रोजगार तर निर्मिती झालीच आहे आणि  त्याचबरोबर पर्यटकांना खेड्यातील जीवन जवळून पाहता येतं.

पुरुषवाडीला कसे जाल?

स्रोत

पुरुषवाडी हे अहमदनगर जिल्ह्यात, अकोले या तालुक्यात आहे. मुंबईपासून हे गाव २०० किलोमीटरवर वसलंय. एखादी कार भाड्याने घेणे हा इथे पोहोचण्याचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग असू शकतो. पण तुम्ही रेल्वेनंसुद्धा या ठिकाणी पोहोचू शकता. पुरुषवाडीपासूनचं जवळचं स्टेशन कसारा (९० ते १०० किमी अंतर) आणि इगतपुरी (८० ते ९० किमी दूर) आहेत. यापैकी एका स्थानकावरून तुम्ही बस किंवा जीपवर राजूर पेट्रोल पंपावर पोहोचू शकता आणि तिथून पुढं जीपनं पुरुषवाडी गावापर्यंत सहज पोहोचता येतं. 

तर वाचकहो, कोण कोण जाणार पुरुषवाडीच्या काजवा महोत्सवात? गेलात तर तुमचा अनुभव आमच्याबरोबर नक्की शेअर करा!!!

सबस्क्राईब करा

* indicates required