कोण आहे हा निश्चय लूथरा ?? आणि त्याच्यासाठी क्रिकेटर्स आपलं ट्विटरवरचं नांव का बदलत आहेत ?

के.एल. राहुल, ऋषभ पंत, रोहित शर्मा या क्रिकेटर्सच्या ट्विटर अकाउंटवर सध्या एक नाव पाहायला मिळतंय. पण हा मनुष्य कोण आहे हे फारसं आपल्याला माहित नाही राव. कुणी निश्चय लूथरा आहे म्हणे. रोहित शर्माने आदिदासचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात हा निश्चय दिसला. पण कोण आहे हा? क्रिकेटर्स याला एवढं महत्व का देत आहेत? चला थोडा उत्खनन करू !!!

 

कोण आहे निश्चय लुथरा?

नॅशनल लेवलवर १२ मेडल्स, त्यातील ९ गोल्ड मेडल्स आणि इंटरनॅशनल लेवल वर ३ मेडल्स जिंकणारा हा पठ्ठ्या स्केटर चॅम्पियन आहे मंडळी!! निश्चयचं वय अवघं १८ वर्षं आहे आणि वयाच्या १० व्या वर्षापासून तो स्केटिंग करतोय. स्केटिंगमधल्या सिंगल आणि पेअर्स या दोन्ही पद्धतींत तो मास्टर आहे.

स्रोत

२०१२ साली त्यानं दोन्ही पद्धतीत गोल्ड जिंकल्यानंतर २०१३ साली थोडं नमतं घेतलं आणि सिल्वर पदक पटकावलं. पण पुढं दुसऱ्याच वर्षी २०१४ साली सरशी करत पुन्हा गोल्ड मिळवलं.

luthraस्रोत

२०१४ साली मनीलामध्ये झालेल्या ‘वर्ल्ड डेवलपमेंट ट्रॉफी’ मध्ये निश्चय तिसऱ्या क्रमांकावर होता. त्या ट्रॉफी दरम्यान झालेल्या काहीशा खराब कामगिरीमुळं तो आपल्या खेळावर नाराज झाला. या सामन्यातली उणीव भरून काढण्यासाठी त्यानं अमेरिकेत जाऊन ट्रेनिंग घ्यायचं ठरवलं. पण आर्थिक अडचणीमुळं त्याला ट्रेनिंग मध्येच सोडून भारतात परतावं लागलं होतं.

 

क्रिकेटर्स आणि निश्चयचा संबंध काय ?

  आदिदास एक स्पोर्ट्स ब्रँड असल्यानं निश्चयच्या अडचणीत त्यांनी मदत करायचं ठरवलंय. #FanTheFire या कॅम्पेन अंतर्गत त्यांनी निश्चयला मदत करण्याबाबत लोकांना आवाहन केलंय. निश्चयला २०१८ सालच्या विंटर ऑलम्पिकसाठी तयारी करायची आहे. त्यामुळं त्यासाठी लागणारी तयारी आर्थिक कारणाने मध्येच थांबू नये म्हणून आदिदास चा हा स्तुत्य प्रयत्न आहे.

याच #FanTheFire ला प्रमोट करण्यासाठी क्रिकेटर्स सरसावले आहेत. त्यांनी आदिदासचा व्हिडीओ शेअर केलाय. के.एल. राहुल आणि ऋषभ पंत यांनी तर आपल्या ट्विटर अकाउंटचं नाव बदलून निश्चल लुथरा देखील ठेवलं. या प्रयत्नांना आता यश येताना दिसतंय. आदिदासचा हा उपक्रम वाढतोय आणि तो पुढे वाढवत राहणं ही आपली जबाबदारी आहे.

एका स्पोर्ट्समनसाठी दुसऱ्या स्पोर्ट्समननं मदतीचा हात पुढं करणं हे खरचं कौतुकास्पद आहे. आपल्या क्रिकेटर्सना मानाचा मुजरा !!

सबस्क्राईब करा

* indicates required