computer

तुमचा आधार कार्ड आतापर्यंत किती वेळा वापरला गेला आहे ? माहित करून घेण्यासाठी हे जरूर वाचा !!

या वर्षी आधार कार्ड ९ वर्षांचं झालं. या ९ वर्षांमध्ये १०८ कोटी लोकांकडे आधारकार्ड आलेलं आहे. तुमच्याकडेही असेलच. या आधार कार्डचा वापर अनेक गोष्टींसाठी होतो. म्हणजे बघा..  सीम कार्ड घेण्यासाठी, पासपोर्ट बनवून घेण्यासाठी, इन्कमटॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी, एलपीजी सबसिडीसाठी आणि इतर अनेक कारणांसाठी. 

तुमचं आधार कार्ड अशाच काही गोष्टींसाठी वापरलं गेलं असेल.  पण आपलं आधार  जर का कोण्या दुसऱ्या व्यक्तीने आपल्या नकळत वापरलं असेल तर हे कसं समजणार? आणि आजपर्यंत आपलं कार्ड  कोणकोणत्या कामांसाठी आणि कधी वापरलं गेलंय हे समजण्याचा मार्ग काय ? मंडळी, या बाबतीत माहिती मिळवणे शक्य आहे बरं...

तुमच्या आधार कार्डचा आजवरचा वापर जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या स्टेप्स फॉलो करा :

१. सर्वात आधी “युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया” (UIDAI) च्या वेबसाईट वर असलेल्या 'Aadhaar Authentication History' या ऑप्शनवर क्लिक करा.

https://resident.uidai.gov.in/notification-aadhaar

 

२. तुमचा ‘आधार कार्ड क्रमांक’ आणि ‘सिक्युरिटी कोड’ टाईप करून ‘Generate OTP’ वर क्लिक करा.

३. आधार कार्डशी लिंक असलेल्या फोन नंबरवर तुम्हाला OTP कोड येईल.

४. OTP कोड एन्टर करण्याआधी तुम्हाला हव्या असलेल्या माहितीचा कालावधी आणि रिकॉर्ड्सची संख्या निवडा.

यानंतर तुमच्या आधार कार्डचा वापर कधी आणि कशासाठी झाला याची माहिती तुमच्यासमोर येईल. जर तुम्हाला असं वाटलं की तुमच्या आधार कार्डचा वापर तुमच्या नकळत कोणीतरी दुसऱ्याने केला आहे, तर अशावेळी तुम्ही आधार कार्डची माहिती लॉक करू शकता आणि तुम्हाला वाटेल तेव्हा ती अनलॉक करू शकता. 

मंडळी आता तुम्हीही तुमची आधार कार्ड ची माहिती नीट तपासून घ्या.

सबस्क्राईब करा

* indicates required