हे २६ फोटो तुम्हांला सांगतील जगातली प्रत्येक स्त्री का सुंदर असते...तुम्हांला काय वाटतं ?
जगातल्या कोणत्याही भागात गेलात तरी ‘स्त्री’ ही सुंदरच असते हे दाखवून दिलंय रोमानियाच्या 'मायकेला नॉरॉक' या फोटोग्राफरने. तिने तिच्या "अॅटलस ऑफ ब्युटी" पुस्तकासाठी जगभर सफ़र करून जगाच्या कानाकोपऱ्यातल्या स्त्रीला आपल्या कॅमेऱ्यात टिपलं आहे. तिचं हे पुस्तक ११ सप्टेंबर, २०१७ रोजी प्रकाशित झालं असून ते तुम्हीhttps://www.amazon.in/Atlas-Beauty-Mihaela-Noroc/dp/184614941X या संकेतस्थळावर घेऊ शकता.
मायकेला म्हणते की प्रत्येक स्त्री आपल्या पद्धतीने सुंदर असते. तिच्या पुस्तकामागची प्रेरणा देखील हीच आहे. तिच्या म्हणण्याला हे फोटोग्राफ्स १०० टक्के सिद्ध करत आहेत. तिचं पुस्तक प्रत्येकालाच घेता येईल असं नाही त्यामुळे पुस्तकातले काही फोटो आज आम्ही खास बोभाटाच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.
चला तर बघुयात मायकेला नॉरॉक ने टिपलेली स्त्री आणि तिचं सौंदर्य :