computer

गुरुत्वाकर्षणाचा नियम धाब्यावर बसवलेली जगातली १० अद्भुत ठिकाणे!! यातले एक महाराष्ट्रात आणि एकूण पाच भारतात आहेत!!

पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण आहे म्हणूनच तर आयुष्य बरं आहे. हे नसते तर विचार करा की काय गंमत(!) झाली असती? माणसाचे पाय जमिनीवर असण्याचे गुरुत्वाकर्षण हेच कारण आहे. पण तुम्हाला माहीत आहे जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे गुरुत्वाकर्षण काम करत नाही. आज आपण भारत आणि भारताबाहेरील अशा दहा ठिकाणांची माहिती घेऊयात.

१. नाणेघाट महाराष्ट्र:-

नाणेघाट हा जुन्नर व कोकणातील मुरबाड या शहरांना जोडणारा व्यापारी मार्ग आहे. असे म्हणतात हा घाट शिवाजी महाराजांच्या काळात व्यापाऱ्यांरी दळणवळण करण्यासाठी हा घाट वापरत. इथले सर्वात सुंदर आकर्षण हे पावसाळ्यात असते. ते म्हणजे इथले धबधबे! पण आश्चर्य म्हणजे इथे धबधबे गुरुत्वाकर्षण नियमाच्या विरुद्ध पद्धतीने वाहतात. या धबधब्याचे पाणी खालून वरच्या दिशेला वाहते. म्हणून त्यांना रिव्हर्स वॉटर फॉल म्हणतात. दर पावसाळ्यात हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात.

२. लेपाक्षी मंदिर, आंध्रप्रदेश:-

आंध्रप्रदेशातील अनंतपुर जिल्ह्यात लेपाक्षी मंदिर आहे. हे मंदिर 1583 साली बांधलेले आहे आणि ते वीरभद्राला समर्पित केलेले आहे.  या मंदिरातील झुलता खांब खूप प्रसिद्ध आहे. या मंदिरात एकूण 70 खांब आहेत, पण त्यातील हा फक्त एकच खांब हा जमिनीवर वसलेला नाही. तो तरंगता आहे.

 

३.गोल्डन रॉक, म्यानमार :-

म्यानमारमधील हा भव्य खडक कोणत्याही क्षणी पडेल असे वाटते. पण तब्बल २५०० वर्षांहून अधिक काळ तो आहे तसाच आहे. याची उंची तब्बल ४९ फूट आहे. याचा रंग सोनेरी असल्यामुळे त्याला गोल्डन रॉक म्हणतात. इथे आख्यायिका अशी आहे की तो दगड बुद्धाच्या केसांनी धरलेला आहे. शिवाय एका दंतकथेनुसार हा दगड फक्त स्त्रीच हलवू शकते, म्हणूनच स्त्रियांना खडकाला स्पर्श करण्याची परवानगी नाही.

४. मॅग्नेटिक हिल, लडाख:-


आपल्या भारतातील जम्मू काश्मीर मधील लडाख लेहमध्ये हा एक डोंगरी भाग आहे. त्याला मॅग्नेटिक हिल असे म्हणतात. याचे कारण त्या भागात समजा आपण गाडी न्यूट्रल स्थितीत ठेवली तर ती खाली न येता चक्क वरच्या दिशेला जाते. इथे गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत नाही. हे आजमवण्यासाठी अनेकजण गाडी बंद करून पाहतात. त्या भागात ही माहिती देणारा तसा फलकही लावला आहे.

५. तुळशीशाम रस्ता, गुजरात:-

हा रस्ता गुजरातमधील अमरोली आणि सोमनाथ जिल्हय़ाच्या सीमेवर आहे. येथील तुळशीशाम हे श्रीकृष्णाचे मंदिर प्रसिद्ध आहे. हे तब्बल ३००० वर्ष जुने आहे.इथे कृष्णाने दैत्याला मारले होते असे म्हणतात. येथेही मॅग्नेटिक हिल प्रमाणेच गाडी आपोआप वरच्या दिशेला खेचली जाते. येथे गुरुत्वाकर्षण नियम चालत नाही. तिथले स्थानिक असे मानतात की हा वर खेचणारा रस्ता स्वर्गाकडे जातो.

६.कृष्णा बटर बॉल, तामिळनाडू:-

महाबलीपुरम हे ऐतिहासिक शहर आहे. तिथे एक मोठा गोलाकार दगड आहे, ज्याला ‘कृष्णाचा बटर बॉल’ म्हणतात. याचे कारण म्हणजे येथे गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू होत नाही. हा सुमारे ५ मीटर व्यासाचा २५० टन वजनाचा प्रचंड दगड आहे. हा दगड एका तिरप्या भागावर ४५-अंशाच्या कोनात उभा आहे. त्याला खाली ढकलण्याचा प्रयत्न कितीही केला तरी तो खाली जात नाही. असे म्हटले जाते की मद्रासचे गव्हर्नर, आर्थर लॉली यांनी खडक हलविण्यासाठी सात हत्तींचा वापर केला, तरीही हा दगड एक इंचही हलला नाही.

७.हूवर धरण (Hoover Dam)  अमेरिका:- 

हूवर धरण हे अमेरिकेत आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे इथे गुरुत्वाकर्षण नाही. म्हणजे नियमाप्रमाणे कोणतीही वस्तू वरच्या दिशेला फेकली असता ती खाली पडते.  पण या धरण क्षेत्रात तसे होत नाही.  समजा तुम्ही एखादी बाटलीतले पाणी खाली ओतले तर ते खाली न जाता वरच्या दिशेने उडते. हे आश्चर्य अनुभवायला अनेक पर्यटक इथे भेट देत असतात.

 

या धरणावर गुरुत्वाकर्षणाचा नियम काम करत नाही, नक्की कोणते ठिकाण आहे हे?

८. फॅरो वॉटरफॉल स्कॉटलंड:-


आपण कधी धबधब्याचे पाणी उलट्या दिशेला वाहताना पाहिले आहे का? नाही?.... मग तुम्हाला फॅरो वॉटरफॉल पहायला जावेच लागेल. हा धबधबा खालच्या दिशेला न वाहता, खालून वरच्या दिशेला वाहतो. हा स्कॉटलंडमध्ये आहे.

९. मिस्ट्री स्पॉट, सांताक्रूझ, कॅलिफोर्निया:-

नावाप्रमाणेच हे एक रहस्यमयी ठिकाण आहे. ते अशाकरता की इथेही गुरुत्वार्षणाचे सर्व नियम चुकीचे ठरतात. येथे कोणतीही वस्तू जमिनीवर न राहता आकाशाच्या दिशेने वर उडते. याला मिरॅकल स्पॉट असेही म्हणतात. याचा शोध १९३९ मध्ये लागला.  पूर्वी या ठिकाणी जर घर बांधायचे असेल तर इंजिनिअर आपले सामान घेऊन येत असत, पण त्यांच्या सर्व वस्तू जमिनीवर न राहता हवेमध्ये उडून जात. नंतर जॉर्ज प्राथर या इलेक्ट्रिशियनने ही जागा विकत घेतली. त्याने त्या जागेवर क्रेझी हाऊस बांधले. ते खूप गाजले. त्यानंतर  त्याचा मुलगा आणि  प्राथरचा पार्टनर मॅक क्रे याने याचे नाव "मिस्ट्री स्पॉट" असे ठेवले. त्यामुळे अनेक  पर्यटक तिथे येऊ लागले. 

१०. स्पूक हिल, फ्लोरिडा:-

 

फ्लोरिडातील स्पूक हिल हे ठिकाण सुद्धा "मॅग्नेटिक हिल" प्रमाणेच आहे. वाहन न्यूट्रल स्थितीत ठेवले तरी ते वरच्या दिशेला चढून येते. खरंतर गुरुत्वाकर्षण शक्तिमुळे खालच्या दिशेला यायला पाहिजे. पण तसे न होता विरुद्ध दिशेला खेचले जाते.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required